पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे ~ चंगो च्या चारोळीत माणसांची श्रीमंती खरी पैसा काय इथेच राहणार आहे! सत्पात्री दान म्हणता ते दान करणारा व्यक्ती विचार करत नाही त्याचा चांगुलपणा आड येतो आपला विकास झाला तसा आपल्या जवळच्या माणसांचा होवो असं वाटतं! पण एहसान फरामोश लोक सगळीकडे सापडतात! वेळेवर मदत करून सुद्धा माझ्या वडिलांच्या चुलत भावाने त्यांच्या कुटूंबाने वाईटच गोष्टी एक एक केल्या ! जित्याची खोड शेवटी!
।।।।
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
~ वपु काळे | वपु सांगे वडिलांची कीर्ती
।।।
दादा कोंडके हे सुध्दा बोलले त्यांच्याकडे खूप पैसा , प्रसिद्धी होती पण आपलं माणूस नव्हतं! म्हणून पुढच्या जन्मी तरी माणसं दे पैसा कमी दिला तरी चालेल असं वाचनात आलं आहे!

0 comments:
Post a Comment