कोरोना पाहुणा आल्यामुळे
आज काल घरची कामं करतो (स्वतःच्याच) हे ही सांगतात बायका मग त्यात गायक, कलाकार पण आले! गृहिणी घरची कामं कितीही करत असली तरी तिचं प्रदर्शन तर करत नाही मी कचरा काढला .. लादी पुसली (स्वतः च्या घरची) हे सगळं सांगायची गरजच का पडते ? कदाचित #stayathome मध्ये #workathome हे हे काम आम्ही करतोय हे सांगावस वाटत असेल ! तसही आज काल प्रत्येक गोष्ट रोजनिशी मध्ये न लिहिता social media किंवा live वर सांगण्यात धन्यता वाटते! व्यसनच की हे आज मी इकडे फिरायला गेलो आज मी हे खालं ह्या हॉटेल मध्ये खालं ! नंतर फोटो ! मग like comment ची वाट बघणं आलंच! काही जण मी काही तर करते हे सांगण्या मागचा कारण impress करणं समोरच्याने आपली दखल घ्यावीच म्हणून केली जातात ! जेव्हा कोरोना नव्हता तेव्हाही गृहिणी घरी असायची आणि #24×7 #workathome स्वतःच्या कुटूंबासाठी करायची करत आहे पण तिला प्रदर्शन करावंसं वाटलं नाही ह्यालाच निरागसता म्हणतात! आपल्या माणसांसाठी निस्वार्थी पणे झटणे म्हणतात!कोणी दखल घ्यावी म्हणून कधीच राबत नसते ती खरी गृहिणी !☺️
#vidyamslife

0 comments:
Post a Comment