महाराष्ट्र राज्यात सिद्धिविनायक trust असो शिर्डी trust असो दानपेटी सुरू असते देवाच्या नावाने जशी waqf च्या नावाने त्यांच्या समुदायासाठी जमीन दान करतात तशी पण समाजातल्या गरजू घटकांसाठी ह्यांचे हाथ खाली असतात! आपल्या राज्यात आरोग्य व्यवस्था शहरात असूनही योग्य सेवा करत नाही पैश्या अभावी एका आईचा जीव घेतात हॉस्पिटल मात्र सरकारी योजनांचा लाभ घेतात .
इतकं माहिती असुनही एकाही संस्थेने दानपेटीतील रक्कमेतून गरजू साठी हॉस्पिटल काढू असं बोलले नाही पैश्याचा बाजार करण्यात सगळे व्यस्त नुसते ! करोडो चे पैसे जमा करून बँकेत काय उपयोगाचे जोपर्यंत वापर होत नाही तोपर्यंत ! सगळ्या दानपेटी बंद करायला हव्यात जेवढा आहे पैसा त्यावर १०० हुन अधिक वर्ष टिकेल की यांचा कारभार !
लाडू विकून धंदा करतात ते वेगळं !
समाजासाठी काम करायला मात्र कोणी पुढे येत नाही !
साईबाबा च उदाहरण आयुष्यात फकीर म्हणून जगलेले स्वतः कडे जे काही आलं त्याचा सर्वा मध्ये वाटप करून टाकायचे साठवून काहीच ठेवायचे नाहीत मग अश्या साईबाबा मंदिरांनी , सिद्धिविनायक मंदिरांनी हॉस्पिटल का बांधू नयेत समाजासाठी ?
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment