माणूसकी शून्य हॉस्पिटल .. डॉ कसे असावेत? कसे नसावेत ?

मंगेशकर कुटूंबाला जमीन दान केली  खिलारे कुटूंबांनी. सरकारच्या मध्यस्थीमूळे आणि सामाजिक सेवा करणार म्हणून वर्षाला १ रु च्या भाड्याने. ही लोकं गरजूंना मदत करत नाहीत. हॉस्पिटल बांधताना सुध्दा समाजाने मदत केली.
जेव्हा त्या कुटूंबातील व्यक्ती दान करणारी व्यक्ती निधन झालं तेव्हा त्याच हॉस्पिटल मध्ये बेड नाही म्हणाले. घरच्यांना लवकर सांगायचं नव्हतं तर एक दिवस सुद्धा ठेवू शकत नाही असं सांगितलं.  नंतर फोन केले तेव्हा त्या हॉस्पिटल च्या लोकांनी १० मी बेड उपलब्ध केला .

त्या कुटूंबाने कधी मोफत उपचार घेतले नाही. ना कुठे हॉस्पिटल वर नाव ना trust मध्ये कोणी माणूस.

एका हाताने दान केलेलं दुसऱ्या हाताला कळू नये असं दान करायचे.

हे हॉस्पिटल करोडो ची उलाढाल करतं आणि २७ कोटी चा कर सुद्धा भरला नाही यांनी. सामान्य माणसाने कधी कर भरला नसता तर राज्य सरकारने कायदे दाखवले असते.

जमीन दान दिलेली .हॉस्पिटल बांधताना समाजाने मदत केली तरी अहंकाराने भरलेली माणसं. स्वार्थी मेलेल्या च्या टाळू वरचं लोणी खाणारी.

दोन मुलींच्या आई ने जीव गमावला . तसं अजून काही सामान्य माणसांना अनुभव आले आहेत emergency असली तरी admit करत नाहीत.

समाजाने दबाव घातला म्हणून deposit कमी केले आहेत.

ना कर भरत हे हॉस्पिटल ना गरजू लोकांना सेवा देत.

कोणाकडे पैसे असले तर त्यांची फसवणूक करतात.
पैसे च कमवायचे होते सेवा भाव नव्हता.
ज्या समजा कडून घेतलं त्याच्या साठी परत द्यायचं हा भाव ही नाही त्या हॉस्पिटल कडे .

कोणाची आई गेली कोणाचा डॉ नवरा गेला. जो गरिबी तुन शिक्षण घेऊन मोठा झालेला . समाजसेवक ही होता.

ह्यावेळी ज्या ज्या सामान्य लोकांनी त्रास सहन केला त्याना मीडिया मुळे स्वतः चे अनुभव सांगायची संधी मिळाली.

सरकार दोन बाळाच्या आई ला न्याय देवो तिच्या कुटूंबाला न्याय देवो आणि समाजाला ही चांगली आरोग्य सेवा देवो एवढीच अपेक्षा.

डॉ च licence बंद करण्यात यावं. घरात ४ का ५ डॉ असताना माणूसकी नाही इतका पैश्या साठी भुकेला.

धर्मदाय म्हणून सगळ्या सुविधा सरकार कडून घ्यायच्या.
समाजातल्या लोकांना मात्र त्रास द्यायचा.
जीव घ्यायचा हक्क यांना कोणी दिला.
रुग्ण डॉ  ला देव मानतो पण हे डॉ त्यातले नसतात हे फक्त श्वास  विकतात. ज्याच्या कडे सेवा भाव नसेल त्यांना डॉ म्हणून काम करण्याचा काही अधिकार नाही.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .