मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी प्रेक्षक वेगळे आहेत त्या हिंदी आणि दक्षिण भारतीय प्रेक्षकांपेक्षा. सध्या चित्रपट सृष्टीतल्याच माणसांची youtube वर चर्चा सुरू आहे तुलना करत आहेत .
पण मराठी प्रेक्षक कोणता कलाकार कशी कला सादर करतो ह्याला महत्व देतात कसा कलाकार दिसतो ह्याला कमी महत्व असतं. टीव्ही माध्यमातून दाखवलं आहे की गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले मालवणी मालिका असो किंवा तुझ्यात जीव रंगला मालिका असो ... मकरंद अनासपुरे यांचे चित्रपट असोत, मच्छिद्र कांबळी यांची नाटकं असोत. सगळ्यांना प्रमाण भाषे पेक्षा गावातल्या बोली भाषा आणि ते कार्यक्रम , कलाकार जास्त आवडतात. दोन मराठी रसिकांनी कळवलं ही मालवणी मालिका आवडली. एका चा परीक्षा सुरू असताना चा ताण कमी झाला आणि एकाला मालवणी भाषा थोडी थोडी बोलायला येऊ लागली . तसही कुठेही व्याकरण लिहिलेलं नसतं पण ऐकूनच तर शिकतो आपण.
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment