निरागसता


निरागसता कमी कधी होते? 
बालपणी मुलं आपल्याला आवडेल ती गोष्ट करून मोकळी होतात. समाज काय बोलेल किंवा समाज नावाची गोष्ट ही माहिती नसते. आपल्या आजूबाजूला फक्त पालक , नातेवाईक ,मित्रमंडळी एवढंच  छोटंसं विश्व असतं.

माणसं ओळखता येत नसतात . कोणाशी काय बोलावे कसं बोलावं , कसं वागावं यासाठी विचार करावा लागत नाही.

कोणावर तरी आपली छाप पडावी म्हणून गोड गोड बोलून काम करून घ्यावे किंवा आपण छान वागायलाच हवं म्हणून वेगळा मुखवटा घालून जावं लागत नाही.  म्हणून मोकळेपणाने समाजात वावरणे होते.

आपण आपल्याला आहे तसे स्वीकारतो. आपल्याला पाहिजे तसं वागून मोकळे होतो. इतरांकडून  अपेक्षा कमी असतात.

म्हणून निरागसता टिकून असते बालपणी.

मोठे झाले की कोणतीही कृती करताना चांगलं काम असलं तरी खूप विचार करणं सुरू आणि नंतर कुठे काही काळ गेल्यावर कृती होते.


#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .