यशस्वी होण्यासाठी कुटुंब महत्त्वाचे

नोकरी करणाऱ्या स्वतः च्या मुलांना मराठी पालक कायमच मदत करतात. त्या पालकांचं पहिलं ध्येय मुळात हेच असतं शिक्षण दिल आता कमाई करावी आणि मग संसार करायला मोकळा.
पण लेखन करणारी व्यक्ती, कलाकार , खेळाडू , वाचनाची आवड असेल कोणाला तर शिकलेले पालकच पाठिंबा देत नसतात याउलट अशिक्षित किंवा शेतकरी पालक मुलांना जे करायचं ते कर म्हणून मोकळीक देतात ।

आता पर्यंत जितक्या मुलाखती ऐकल्या त्यात एकच गोष्ट साम्य होती ती म्हणजे वडिलांचा पाठिंबा. काही कलाकारांना तर एकत्र कुटुंब म्हणून पूर्ण कुटुंबाचा पाठिंबा होता.  भाऊ, वहिनी , काकी , काका इत्यादी सगळे आले.

कोणी तरी यशस्वी होत असेल तर आजूबाजूची परिस्थिती आणि स्वतःची मानसिकता नंतर कुटुंबातल्या व्यक्ती ची सोबत कारणीभूत असते!

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .