Parenting कशी करावी

मुलांना चढ उतारात पालकांची साथ लाभणे महत्वाचे असते. नाहीतर आपल्या इथले पालक struggling period मध्ये सोबत द्यायची सोडून नकारात्मक वागणारे जास्तच.  तर कधी स्वतःच्या मुलांची इतरांच्या मुलांसोबत तुलना करण्यात व्यस्त. प्रोत्साहन द्यायचं साथ द्यायची सोडून निरुत्साही करण्यात पटाईत असतात! 
मुलाच्या यश आणि अपयशा कडे तटस्थ राहून साथ देणारे त्याला प्रोत्साहन देणारे; मदत करणारे पालक कधीही चांगलेच. भविष्याची चिंता करत वर्तमानात जगणारे कमी . त्याला आवडते ती गोष्ट करू देण्याचं स्वतंत्र आणि स्वतःच्या मुलांना समजून मदत करण्यासाठी समजुतदार पणा मुळात पालकां मध्ये असावा लागतो.नाहीतर प्रगती कमी आणि अधोगती जास्त .  पालकांच्या नकारात्मक वागण्या मुळे मानसिक आरोग्यावर ही परिणाम होतो तो वेगळाच. शेवटी कोणी परिपूर्ण नसतं ज्याची त्याची वाट ज्याला त्याला आज न उद्या मिळतेच फक्त मुलं आणि पालकांनी धैर्य सोडायच नसतं.

© #vidymsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .