वाचक म्हणून अनुभव


एका पुस्तकाचे वाचक अनेक आणि प्रत्येकाचा वाचन अनुभव वेगळा असतो!  
वास्तविक विषयावर लिहिलेले पुस्तकांच्या बाबतीत तरी हेच होतं. वाचकांच्या मनस्थिती वर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यभर घेतलेल्या अनुभवामुळे असावं वेगवेगळी मत वेगळा अनुभव..
गद्य असो पद्य प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टप्प्यावर तेच पुस्तक वाचल तरी अनुभव वेगळा येऊ शकतो आयुष्यातले अनुभव संदर्भ बदलतात तसं एकच पुस्तक वेगवेगळ्या टप्प्यावर वाचलं की नवीन अनुभव देऊन जातं!
कधी कधी आपण पुस्तक काही वर्षांपूर्वी वाचलं असतं तर वेगळं वाटलं असतं आणि पुन्हा काही वर्षांनंतर वाचलं तर वेगळा अनुभव येईल असं मनात आपसूकच येत!
काल्पनिक असो वास्तविक असो आपल्या आवडी निवडी कळतात तर कधी बदलत ही असतात! 

#vidyamsblog 

वाचाल तर वाचाल

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .