post 84 सुकून

सुकून

 कला बघून किंवा सादर करून समाधान मिळावं ती खरी कला!
आज राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर चा चित्रपट बघितला! अमूक अमुक परिस्थिती मध्ये अडकलेल्या स्त्रियाचं विश्व दाखवणारा!  मागणी तसा पुरवठा म्हणून आजही या स्त्रियांचं अस्तित्व आहे आपल्या समाजात!  जे सत्तेत  असतात उदा  पोलिस , वकील , नेते त्यांच्या मुळे याचं अस्तित्व टिकून आहे म्हणायचं! नाहीतर अमुक अमुक योजना देऊन कोणतंही सरकार त्यांना काम देऊन कमाई करायला इतर मार्ग दाखवलाच असता की! 

मराठी किडा हा सुद्धा घेऊन आला मुलाखती त्याच्या youtube channel साठी काही फरक नाही हिंदी चित्रपट मध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आयुष्यात ही तेच चित्र दाखवलं आहे! 
माणसं गप्पा मारायला ही येतात आणि त्या ही स्त्रिया असतात त्यांना ही मुलं होतात , कोणी आवडायला ही लागतं आणि मुलांनी डॉक्टर , चांगलं शिक्षण घ्यावं ही सुद्धा इच्छा असते त्या स्त्रियांची!

चित्रपटातला हिरो काही त्या स्त्रीला समाजाच्या भीतीने स्वीकारू शकला नाही तरी आज काल काही पुरुष असतात विवाहित ( नावासाठी) , बार किंवा इतर ठिकाणी कोणी व्यक्ती भेटली आवडली तर तिला मानाने जगण्या साठी त्या परिस्थितीतून बाहेर काढून तिला स्वतंत्र घर देतात आणि आयुष्याच्या गरजा ही तिच्या भागवतात! ते खरं स्त्रीला मान देतात म्हणायचं! घरचं जेवण मिळालं नाही की माणूस हॉटेल मध्ये जातो की  म्हणून अश्या स्त्रिया अस्तित्व टिकून आहे.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .