गझल का गजल समूहात आज एक वाद उद्या दुसरा! गजल आणि कविता बोलणारे तर अजून महान की! कविता मध्ये गजल असते ! फक्त पद्य आणि गद्य दोनच प्रकार असतात की शाळेच्या पुस्तकात ! चार पाच वर्षापूर्वी ही कोणाच्या तरी रामायण कवितेवर वाद घालता होता ! सगळे दोन भागात विभागले गेले! राजकारण्यां सारखे !स्वतः ची कविता लिहावी पाहिजे तेव्हा प्रकाशित करावी पुस्तक नाहीतर ई पुस्तकात उगाच चोरी झाली की कशाला मानसिक त्रास करून घ्यायचा ! प्रवीण दवणे का कोणत्या तरी लेखकाच्या पुस्तकात वाचलं होतं ''संत समाजात असतात संतांचा समूह नसतो ! तसे साहित्यिकांनी वाचकां मध्ये राहावं '' या अर्थाने होतं!
नाहीतर मानसिक त्रास वाद विवाद एक ना दुसरे आज ना उद्या अटळ आहेत आणि राजकारण तर राजकीय नेत्यांना ही लाजवेल इतक्या पातळीचं असतं या फक्त आणि फक्त social media वर आपल्याच समूहात प्रसिद्ध असणाऱ्या गजलकारांचं ! रस्त्यात खऱ्या आयुष्यात किती जण ओळखतात त्यांचं त्यांनाच माहिती ! इतरांचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास करावा की! Social media वर फुकटचा सल्ला आणि फुटकचं ज्ञान नको त्या व्यक्तीला वाटण्यात काहीच अर्थ नसतो! त्या पेक्षा नवीन कवी ना घडवावं की शाळा महाविद्यालयात वाचक वर्ग काढावेत ! Youtube वर आपल्याला असलेलं ज्ञान देऊ शकतो की सहज आणि पैसे ही कमवू शकतो की त्या fb वर मोफत ज्ञान वाटण्या पेक्षा!
#विद्या

0 comments:
Post a Comment