वपु

शिक्षणाने सगळी उत्तरं मिळत नाहीत.
मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं.
वस्तू, माणसं, आकडे, इतिहास ह्यांची कोठारं म्हणजे मेंदू.
स्मरणशक्ती, स्मृती ह्यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू.
किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही.
शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस.
नीर-क्षीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. 

नव्या शुध्द विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि
प्रेम-भक्तीसाठी मनाचे, कमळाच्या पानाचे द्रोण निर्लेप हवेत.

व.पु. काळे | तू भ्रमत आहासी वाया

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .