यश अपयशाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकासाठी . काही स्वत:साठी स्वतः च शिखर ठरवतात आणि चालतात. शिखर चढण्यातही आनंद असतो हा ज्याचा तो उपभोगत असतो. स्पर्धा स्वतः सोबत च हवी . आपला आलेख आपल्याला माहिती असला की पुरेसं असतं. काही दुसऱ्यांच्या डोळ्यात खुपावं म्हणून यश मिळवण्यासाठी धडपड करतात. समाजात नाव व्हावं म्हणून धडपडत असतात मग भले स्वतः च्या मुलाला कले मध्ये आवड असली तरी दुर्लक्ष करतात पहिलं कारण स्पर्धा आणि दुसरं पैसा. काही मुलं स्वतःच आयुष्य स्वतः घडवतात तर काही इतरांचं ऐकून घडतात. आजूबाजूला फुकट सल्ले देणाऱ्यांची कमी नसते. काही स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम असतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे ह्या म्हणी प्रमाणे आयुष्य जगतात. निर्णय मात्र वेळेवर घ्यायचे असतात एकदा वेळ निघून गेली की हवं तसं यश मिळण्यासाठी उतारवयात धडपड करण्यात काही अर्थ नसतो. निरर्थक सगळं.
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment