माणसांच्या सुखाच्या कल्पना काय असतात?
शिक्षण , उत्तम नोकरी , लग्न आणि मुले ती ही हुशार पुढे जाऊन यशस्वी असावी.काही पालक मग मिरवायला मोकळे समाजात. मग इतर पालकांच मुलांची तुलना करणं सुरू. सगळे पालक मात्र विसरतात त्याच्या काळात त्यांना हवं तितकं यश त्यांना मिळालं पण त्यांच्या पेक्षा ही यशस्वी अशी माणसं होती. काही वेगळं काम करणारी ही माणसं असतात की जसं चांभार ,सुतारकाम,भिक्षु की , गवंडी काम करणारी इत्यादी.
सगळ्या प्रकारची काम करणारी माणसं असतात म्हणून एकमेकांना पूरक अशी काम एकमेकांच्या मदतीने पूर्ण होतात.
काही पालक मुलं नोकरी नाही करत म्हणून मानसिक छळ करतात. प्रोत्साहन द्यायचं यांना कोणी शिकवलंच नसतं. मग मुलांचा आत्मविश्वास आणि मानसिक संतुलन ढासळायला हेच पालक कारणीभूत असतात की!
अमुक परीक्षेत पास व्हा अमुक कंपनीत जा अमुक पदावर जा मग तुम्ही मोठे व्हाल !
शेवटी काम कोणतेही करा जोपर्यंत पद आहे तोपर्यंत मान.म्हणून माणसं पदाला जास्त मान देणारी मिळतात आणि माणूस म्हणून माणसांना ओळखणारी कमी , मान देणारी ही कमी.
कोणी मुलं यशस्वी होत नाहीत म्हणून दुःखी कष्टी होतो तर कोणी मुलं आपल्या आपल्या मार्गाला गेली आणि आपला एकटेपणा दिवसेंदिवस वाढत जातो म्हणून दुःखी कष्टी होतात. एक मात्र विसरतो माणूस सुख आपल्यात असतं हे बाकीचे सोबती असतात.आपलं सुख दुसऱ्यावर अवलंबून असलं तर आपण दुःखी होणं अनिवार्य की.
एक गोष्ट खरी असते माणूस एकटाच येतो एकटाच जातो काही दिवस सोबती भेटतात आणि मग जो तो आपल्या मार्गाला जातो.
आपण मात्र स्वतः साठी आनंद मिळण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी शोधून त्यात आपला वेळ आनंदाने घालवायला शिकावं. कलाकार असेल तर कलेत मग्न व्हावं आणि जग विस्मरावं तर कधी भक्ती मध्ये देवाच्या लिन व्हावं आणि मन शांत करावं.
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment