कविता मैत्री

कोणी सोबत आहे
ही जाणीव अनुभवून
वर्षे कित्येक निघून गेली..
आता कोणी असलं सोबत
तरी एकांतची इतकी सवय झाली की
एकांतच हवाहवासा वाटतो
नकोच वाटते
कोणा सोबत गुंतणे
सतत अवलंबून जगणे
वाट बघत क्षण घालवणे
मैत्रीच सुख दिलंस तरी
भेटीची आस काही थांबली नाही
तुला भेटून घट्ट मिठी मारण्या
जीव किती धडपडतो आहे
मनातल्या सगळ्या दुःख आणि चिंता 
हलक्या करून मुक्त मनाने जगीन म्हणते आहे
साथ तुझी लाभल्या मुळे मन कसं शांत निवांत झालं आहे ..
फक्त काही करण्या तुझ्यासाठी धडपडतं आहे !

विद्या
१३.५.२०१६
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .