चेहरा फक्त चेहरा कुठे असतो
आठवणी नुसत्या सोबत घेऊन येतो
कधी कटू कधी गोड
कधी सुखद कधी दुःखद
क्षणांचे स्मरण करतो !
प्रत्येक माणसाचा जणू ठसा असतो
आपल्या मनावर उमटवलेला !
माणसं मनाने दूर जातात
कधी देहाने दूर जातात
हाच चेहरा फक्त सोबती उरतो
आठवणी मध्ये सतत येतो जातो !
चेहरा ज्याची त्याची ओळख असतो
क्षणभंगुर आयुष्यातला सोबती म्हणायचा !
पण आपण असतो का ते? देहाच्या पलीकडे
मनाच्या पलीकडे सुद्धा एक चेहरा आहे की
जो भाव भावनांचं दर्शन घडवतो ...
जो नाती जपतो ..
कधी टिकवतो तर
कधी स्वार्थासाठी तोडतो !
कधी
मन जुळवतो
नाती घडवतो ..
आयुष्य सुखकर करतो !
विद्या
१५.५.२०२६
#vidyamslife

0 comments:
Post a Comment