सध्याच्या सरकारला जनतेकडून पैसे कमवायचे आहेत । स्वतःचा पगार कमी करणार नाहीत हे राजकारणी मात्र gas subsidy सोडा बोलणार । तीन रुपये दुष्काळ ग्रस्तांच्या नावाने काढणार । #politics 2018
🍁🍁🍁🍁
जाहिरात करायचा किती खर्च असतो तरी रामदेव बाबा मोफत press conference घेऊन बातमी देऊन जाहिरात करून मोकळे होतात!
2020
🍁🍁🍁🍁
नमो भक्तच खरे नमो रुग्ण आहेत । बघावं तेव्हा प्रत्येक कृती च समर्थन करत असतात सरकारच्या । 2021
🍁🍁🍁🍁
मुलं आई वडिलांचं प्रतिबिंब असतं। ते जसे घडवतात मोकळेपणाने तर कधी कठोरपणे किंवा मुलं त्यांचं अनुकरण करतात ;कोणी विचार जुळले नाही की विरोध ( चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने) । कोणी तर समाजात न घडवताच मोकाट सोडतात मुलांना (उदाहरण उत्तर प्रदेशातले लोंढे वयाने लहान शाळा अर्धवट सोडलेली मुलं महाराष्ट्रात वास्तव्य करतात पण त्यातले असंस्कारी च जास्त असतात ) म्हणून इतके गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते मग ती स्त्री विरोधात का असेना । कसं वागावं कसं वागू नये हे समाज आणि पालक दोघांच कर्तव्य असतं । काही पालक चुकीचं मार्गदर्शन करतात आणि मुलांचे संसार उध्वस्त करतात ।
गुन्हा केला तर शिक्षा मिळणं अटळ पण आपल्या इथे कायदयांची अंमलबजावणी व्हायलाच वेळ लागतो ।
#vidyamslife 2018
🍁🍁🍁🍁
प्लास्टिक बंदी केली पण त्याला पर्याय न देता सुरू केली । पाच हजार दंड करून खूप रक्कम कमवली यांनी । हुकूमशाही आहे नक्की च । स्वच्छता अभियानाच्या बाबतीतही ते च । कचरा कुंडी काही रस्त्यावर ठेवल्या नाहीत आणि मोकाट दंड घेतात । यातून भ्रष्टाचार नक्कीच होणार । traffic police उत्तम उदाहरण । #politics #vidya
2018
🍁🍁🍁🍁
माणसांचं येणं जाणं सुरू असतं आयुष्यात । आपल्यातला मी प्रत्येक वेळी नव्याने वागतो आणि कळतं इथे आपण प्रत्येक वेळी कसे वागू हे आपल्या आणि समोरच्या व्यक्ती कोण यावरून ठरतं। हिच चांगली आणि वाईट दोन्ही माणसं आणि परिस्थिती आपल्याला बदलत असतात। कोणी मनाने कठोर होतं तर कोणी मनाने मृदू , रागीट, प्रेमळ ।
#vidya
2018
🍁🍁🍁🍁

0 comments:
Post a Comment