🍁🍁🍁🍁
एका क्षणात आयुष्य जगतो
एका क्षणात कोणाशी मैत्री होते
गप्पा रंगतात
एक क्षण पुरेसा असतो नातं जोडायला
सगळं काही क्षणाक्षणाला घडत असतं कधी घटित कधी अघटित असं..
तरी जीवन प्रवास सुरूच असतो आपल्या दिशेने अखंड अविरत..
क्षणात जन्म क्षणात मरण ..लपंडाव सुरूच असतो ..
जीवनाच्या प्रवाहात वाहत जायचं ...
मनसोक्त आयुष्य जगायचं ..
थोडं स्वतः साठी आणि थोडं इतरांसाठी..
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment