काहींच्या तर पचनी पडत नाही सुखसोयी असणाऱ्यांना ही मानसिक आजार होऊ शकतो! दुःख काय गरीब श्रीमंत बघून येत नसतात! संघर्ष काळात सोबत हवी असते एका तरी व्यक्तीची ! समजून घ्यायला एक व्यक्ती असला तरी वाईट क्षण चुकवू शकतो !
आपल्या। इथे मुलांना जन्म देण्याचं मुख्य कारण एक तर वारस किंवा वय झालं की मुलांनी पालकांना सांभाळावे! पैसे जमवून ठेवतो उतारवयात तसे आपल्या इथे मुलं जन्माला घालतात! त्या मुलाच्या मानसिक गरजा , आवड , गुण सगळं दुय्यम स्थानावर ! फक्त आणि फक्त पैसे कमवणे उदरनिर्वाह हा एक उद्देश आधी असायचा ! आता समाजात मान मिळावा हा उद्देश असतो ! मग मुलगा नोकरी करतो हे सांगण्यात जास्त आनंद ! मुलाने जास्त गुण घेतले हे सांगण्यात धन्यता वाटते पालकांना !
त्याच्या सुख दुःखा शी त्यांना काही पडली नसते! त्याला कोणत्या गोष्टीत समाधान वाटेल हे सुध्दा गरजेचं वाटतं नाही! जास्त शिकलेला असेल तर उत्तम पगाराची नोकरी हवी छोटा मोठा व्यवसाय करणं म्हणजे इतकेच पैसे लोकांना समाजाला काय सांगायचं हा पडलेला प्रश्न असतो मोठा! आवडतं मनासारखं काम करायला देणारे पालक मोजकेच असतात!
प्रत्येकाला स्वप्नांची किमंत चुकवावी लागते!कोणी स्वतःची स्वप्न पूर्ण करायला घर सोडत तर कोणी पालकांची नको ती बोलणी ऐकत!आपण आपल्या वाटेवर चालत जायचं मग सोबत कोणी असो की नको!
एकाने चप्पल बनवण्याचा धंदा केला किंवा कोणी जोडधंदा म्हणून हॉटेल मध्ये नोकरी केली तर त्यांचा मान जातो !
© Vidya ms life

0 comments:
Post a Comment