असे नवीन नवीन आजार माणसाला होतं असतात पुराणात सुद्धा जेव्हा औषध सापडली नाहीत तेव्हा रुद्राक्ष ची फळे निर्माण केली गळ्यात माळ घालून आजार बरा झाला! कोरोना च औषधे मिळतील आज ना उद्या वेळेच्या आधी काहीच घडत नसतं! आता माणसं घरात आहेत इतर प्राणी मुक्त संचार करत आहेत! निसर्गाने जागा दाखवली म्हणायची माणसाला! माणूस अमर नाही आणि फक्त पैसे कमवणे हाच एक उद्देश म्हणून माणूस जन्म मिळालेला नसतो!
Survival of the fittest
आर्थिक विकास या काळात कोणाचा होणार कोणाचा नाही ! पण आत्मिक विकास नक्की होईल ज्यांच्या कडे बदल स्वीकारण्याची वृत्ती असेल! सात्विक मन असेल! अहं मी च मोठा
हा मारक ठरतो स्वतःला ही त्रास आणि इतरांना ही! सामाजिक संस्था अन्न दान करत आहेत ही सकारात्मक गोष्ट !
आपली कुटुंब संस्कृती मुळे हे lockdown यशस्वी झालं आहे !
एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ ! वसुदैव कुटूंबकम ही आपली संस्कृती!
13.6.2020

0 comments:
Post a Comment