मराठी चित्रपट सृष्टी आणि कलाकार

मराठी चित्रपट सृष्टी आणि कलाकार 

मराठी मध्ये उत्तम कलाकार आहेत आणि काही लेखन ही करतात. आज काल १०० हुन अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातले काही यशस्वी होतात काही नाही. जे नाही होत त्यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. पॉडकास्ट वरून किंवा कलाकारांच्या मुलाखती वरून कळलं की 
आपल्या कडे काही जण हौस म्हणून चित्रपट बनवतात. 
आपल्या कडे चित्रपट गृह single theater ची जुनी संस्कृती जपावी असे किती चित्रपट सृष्टीतल्या लोकांना वाटतं?

Multiplex मध्ये तिकीट दर अधिक असतात शिवाय तिथलं खाणं पिणे ह्याच्या किंमती तिकिट च्या दरा पेक्षा अधिक असतात ह्यावर सरकार काय करत?? 

Bookmy***  सारखी Website आहे ती ४०% अधिक किंमतीने तिकीट बुक करायला देते.
Theater मध्ये तिकीट बुक केली तर कळतं खरे तिकीट चे दर वेगळे असतात.

मग त्यात काहींना चित्रपट चांगला असून हवे त्या वेळेचे शो मिळत नाही काही चित्रपट असे असतात ज्यांना थिएटर मिळत नाही.

मकरंद अनासपुरे यांनी एका पॉडकास्ट मध्ये उपाय सांगितला आहे तो म्हणजे single theater ची जुनी संस्कृती परत आणायला हवी.

शेवटी त्या काळातच अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे सारखे कलाकार प्रसिद्ध झाले की.


आपल्या इथे आजही मराठी कलाकारांना राजकीय नेत्या कडून मान दिला जात नाही.
काही कार्यक्रम असतील तर हिंदी कलाकार का लागतात यांना असा प्रश्न सुबोध भावे यांनी एका पॉडकास्ट मध्ये विचारला होता.

जो पर्यंत मराठी माणूस मराठी चित्रपट यांना प्राधान्य देत नाही ,मराठी कलाकारांना मान देत नाही तो पर्यंत मराठी चित्रपट सृष्टी कशी मोठी होणार??


विद्या
© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .