महाराष्ट्र राज्यात घरात समाजात इंग्रजी बोलणे म्हणजे उच्चभृ समजलं जातं. कपड्या पासून भाषे पासून सगळं परकीय हवं.
ज्या घरात आई वडील यांना आई बाबा निदान पप्पा तरी म्हणतात ते संस्कृती जपतात म्हणायचं.
आता गुढीपाडवा जवळ येतोय आयुष्यभर western cloth घालणारे फेटे घालून साडी नेसून bike वरून बायका मिरवणूक काढतील संस्कृती कमी fashion show जास्त वाटतो.
बायकांनी फेटा घालणं आपली संस्कृती नाही मुळात.
पुण्यात तर ज्याचं जसं कर्म त्यावरून फेटे बांधायचे.
केरळ मध्ये लुंगी घालतात चित्रपट बघायला जाताना किंवा tv वरच्या मुलखात देताना त्याला म्हणतात संस्कृती जपणं.
दक्षिण भारतीय महाराष्ट्र राज्यात येऊन सुध्दा त्यांची भाषा आणि संस्कृती विसरत नाहीत.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरी वेगळे वर्ग लावतात भाषा शिकवण्यासाठी, भारतीय नृत्य ही शिकवतात .
संस्कृती जपण्याच काम गाव करतात शहरं नाही.
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment