संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या संकटप्रसंगी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. मोगल आक्रमणास सलग ११ वर्षे प्रतिकार केला. शत्रूने घेतलेले राज्य पुन्हा मिळवले. खानदेश, बागलाणपासून जिंजी तंजावरपर्यंत विस्तीर्ण प्रदेशात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या फौजेशी लढाया केल्या. तामिळनाडूत जिंजी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी स्थापन करून मोगल आणि मराठा संघर्षाचे क्षेत्र अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरावरील मद्रास किनारपट्टीपर्यंत विस्तारले. संकट काळातही दक्षिणेसह दिल्ली जिंकण्याची मनीषा बाळगणारे महान छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मुजरा..
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment