प्रवास नात्यांचा

एकदा व्यक्ती दुसऱ्याच्या कोषातून स्वतःच्या कोषात गेली तरी नात्याला पूर्णविराम मिळतो.मग त्यात एकाने दुसऱ्या व्यक्तीला फसवलं असो किंवा भावनिक दृष्टीने एक नातं निर्माण झालं असो सवयीने. एकदा का दुरावा आला किंवा जाणूनबुजून ठरवलं ह्या नात्यात गुंतण योग्य नाही कधी स्वतः साठी कधी दोघांसाठी. मग त्या नात्याचा प्रवास संपला समजायचं. टाळी दोन्ही हाताने वाजते तेव्हा नातं टिकतं.
वेगळं होताना सुरवातीला त्रास झाला तरी नंतर माणूस आपल्या आपल्या जगात जगायला स्वतंत्र पणे मोकळा. फक्त वर्तमान स्वीकारून पुढे जाताना नात्यांच्या सवयींमुळे त्रास होतो इतकंच
! मग नातं कोणतंही असो! काही जणांची सोबत आयुष्यभरासाठी असते आणि काहींची फक्त काही मोजक्या काळासाठी ! निरोप घेताना मात्र दुसऱ्याला कमी त्रास होईल इतकी तरी माणुसकी हवी प्रत्येक व्यक्ती मध्ये.


#vidyamslife
25 nov 2024

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .