सवय

#सवय कसलीही लागू शकते .. कधी वस्तूची कधी  माणसाची नात्याची ...मनाचे खेळ नुसते सारे .. सवय एकाच पद्धतीने विचार करायची लागते कधी संकुचित विचारांची ... विचार बदलायला दृष्टी बदलावी लागते .. तेच किती मोठं स्थित्यंतर..
....कधी धर्माची कधी जाती ची कधी रूढी परंपरेच्या विचारसरणी ची ..बदल आयुष्यात अनिवार्य असतात पण मन कधी तयारच नसतं स्वीकारायला कारण एकच भूतकाळातली सुख  पाठलाग सोडत नाही किंवा एखाद्या गोष्टी मुळे संरक्षण वाटतं म्हणून त्या गोष्टी शिवाय कसं जगावं हे सुचतं नाही .... नव्याने जगणं ..नवे विचार ..नवी वृत्ती स्वीकारणं कठीण च जात कारण जोखीम घ्यायला कुठची ही नवी गोष्ट करायला मन तयार च नसतं । त्यासाठी मनाला कठोर करावंच लागतं परिस्थिती नुसार बदलणे ...आयुष्याला  प्रवाही  करणं जरुरीचं वाटतं ।#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .