बाजार

तसे तर खूप प्रकारचे बाजार भारतात   शहरात भाजी बाजार , मासळी बाजार असतो तसा गावच्या ठिकाणी रविवार बाजार  ,मंगळवार बाजार तसा बुधवार चा ही ...आता Mall मध्ये भरतो तो बिग बाजार ,star bajar ... आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तोलून मापून घेतो.
तसा अजून जरा वेगळा बाजार भरतो   .. ठिकाण विवाह संस्था मुलगा असेल तर उंच , गोरा कुणाला सावळा ,जास्त शिकलेला , चांगली नोकरी करणारा  तर मुलगी असली तर गोरी ,सावळी ,उंच ,भिंग नसलेली, जेवण करता येणारी सुगरण आणि सोबत उच्च शिक्षित , नोकरी करणारी  सून हवी असते का नोकर त्याचं त्यांनाच माहिती इत्यादी इत्यादी आणि मग कुंडली जुळते का पहा , नक्षत्र , स्वभाव जुळतो का पहाणार...भांडखोर नाही , आज्ञाधारी  ... इतक सहज असतं का माणुस ओळखणं   ...इथे सोबत
असून सुद्धा माणसं ओळखता येत नाहीत ..कधी घरच्याच लोकं  घरात अनोळख्या सारखी वागतात तिथे इतरांचं काय ..शेवटी हे ठरवून नाती जुळवण  जुगारच ...कोणाचं जुळतं कोणी ढकलत नाती ....  कोणी तोडून नवी जुळवतं ... वपु च लिहितात " प्रेम घडतं घडवून आणता येत नाही" एकत्र राहण्यासाठी अक्षता लागतं नाही understanding लागतं   .."

#विद्या 3 Dec 2017

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .