May 2018 2





31 May 2018 21:59
मराठी भाषेत वाचकांना मोफत ई पुस्तक उपलब्ध करून द्यायची किंवा पैसे मोजून हे तर प्रत्येकाच्या
मानसिकतेवर असतं। वपु बोलतात तसं कुठचाही विचार बदलणं हे केवढं मोठं स्थित्यंतर असतं। #vidya

31 May 2018 21:37
परीक्षेतल्या मार्काने कोण पुढे यशस्वी होणार की नाही हे थोडी ठरतं। तसही काही तर न शिकताही कले मध्ये कोणी खेळात यशस्वी होणारे ही जन्माला आलेत की।

30 May 2018 15:18
एक बातमी ऐकली आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात नेहरूंच्या अस्थी होत्या इतक्या वर्ष । आता हरवली बातमी आहे । गेल्यावरही सत्तेत राहायची भावना सुटले नसतील म्हणायच ।

30 May 2018 14:05
धर्म ग्रंथ त्यांचा ज्या भाषेत असतो ती भाषा सगळ्यांना अवगत नसते म्हणून मौलाना त्यांचे गुरू गैरफायदा घेतात ज्या नसतात त्या गोष्टी ही पसरवतात।

30 May 2018 13:41
परिस्थिती माणसाला घडवते आणि शिकवते।
#अनामिक

29 May 2018 23:58
यांची संख्या कमी असते तो पर्यंत मान खाली घालून जगतात । संख्या वाढली की मुखवटे बाजूला सरतात। मागे मुंबईत पन्नास हजारावर आलेले एकत्र।

28 May 2018 18:29
पेट्रोल चा दर कमी च असतो हे १००% कर घेतात नाहीतर या नेत्यांचे करोडो चे पगार कसे भागतील । वरुण गांधी यांनी मागेच मुद्दा काढला होता स्वतः चा पगार स्वतः ठरवतात वेतनवाढ म्हणून ।

28 May 2018 11:44
जुन्या फोटोतला सालस पणा आताच्या फोटोत गवसणारच नाही । निरागसता हरवली ना।

28 May 2018 11:07
That's why poetry are best frnds of poet .. first..

28 May 2018 11:06
आताच्या मुलांना तेव्हाच्या गरिबी बद्दल कितीही सांगितलं तरी नाही कळणार । आमच्या कडे सांगायचे वडील त्याच्या लहानपणी च्या गोष्टी । आता काळ बदलला बोलून विषय बदलायचा । पहिली शाळा त्यांच्या वर्गा पासून सुरु झाली। शाळे साठी बांधकाम ही मुलं च करायची । कर्ज घेऊन गरीबी दूर करणारे आता heart attack येऊन जातात ते पण लहान वयात । त्या पेक्षा जिद्दीने शिक्षणा च्या जोरावर यशस्वी झालेले पाहिले आहेत ।

28 May 2018 10:29
Pre poll alliance नाही post poll alliance बनवण्यात रस आहे सगळ्यांनाच । जनतेची मत शेवटी गणित मांडून एकत्र येण्या शिवाय पर्याय कुठे यांच्या कडे । इथे शिवसेना आणि भाजप विरोधकाच्या भूमिकेत आहेत । निवडणूका जवळ आल्या की असंच होतं ।


You need not aspire for or get any new state. Get rid of your present thoughts, that is all.

~ Ramana Maharshi


23 May 2018 22:38
इतर प्राण्यां सारखा मनुष्याचा जन्म मुलं जन्म करायला झाला असतो का ?आत्म उन्नती नावाचा ही प्रकार असतो की। मनुष्य जन्म शेवटच ध्येय स्व चा शोध घेणं असावं । मोक्ष असावं। किती तरी जन्मा नंतर मनुष्य जन्म मिळतो असं वाचलं आहे । ते मूल नाही म्हणून दुःखी आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे । वर्तमानाचा स्वीकार जितका उशीर तितका मानसिक शारीरिक त्रास अटळ। नियतीचा प्रारब्धाचा भाग शेवटी । #vidya




23 May 2018 12:30

संवाद संपला कि मनाची अंतरे वाढतात ; नाती हरवतात . एकमेकांना समजून घेणं संपतं. जिवंतपणी दुरावलेली नाती तोच अंत असतो नात्याचा खरा . मृत्यु आड येतं नाही . मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात . #vidya



22 May 2018 23:31

लोकशाही नाही केरळ आणि प.बंगाल धोक्यात आहे की । डोळे झाकतात ही लोकं अश्या वेळी ।

22 May 2018 22:22

जगातली सगळी दुःख आपल्याला आहेत किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती ला आहेत असा गोड गैरसमज असतो काही व्यक्तींचा । राई चा पहाड बनवण्याची गरज का वाटते । अहं आडवा येत असतो का ? याउलट स्वतः च दुःख विसरून दुसऱ्या च्या सुखाचा विचार करणारी माणस ही असतात । जी सुखी असतात ।

22 May 2018 22:09
कोणत्याही वयात आजारा मुळे किंवा अपंगत्वा मुळे दुसऱ्या वर अवलंबून राहणारी व्यक्ती जन्म घेण्या आधी च त्या व्यक्तीची जबाबदारी घेणारी एक तरी व्यक्ती आधी किंवा नंतर नक्की जन्माला येते। ह्याला म्हणीन देवाची करणी । #vidya

22 May 2018 10:19
काँग्रेस च्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती जास्त होत्या आणि दर कमी 
। आता 100 च्या 80 झाल्या तरी सरकारने दर वाढवले पेट्रोलचे।

22 May 2018 10:12
बातम्या मध्ये काल आकडे कळले 100 ला मिळायचं तेव्हा किंमत कमी होती आता पेक्षा आणि आता 80 ला मिळतंय तरी जास्त ।

21 May 2018 22:09
शेतमालाला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। जनतेला महागाईला सामोरं जावं लागतंच। Digital India म्हणून मिरवून काय उपयोग। तंत्रज्ञानाचा वापर काही होतं नाही हवा तसा। छोट्या देशात जेवढी पाहिजे तेवढीच शेती केली जाते। शेतमाल थेट बाजारपेठेत आणायला दलाल च कशाला लागतात । सगळी कडे च दलालांचं राज्य आहे मग शेती व्यवसाय असो वा रेल्वे चा कारभार । कधी सरकारी गोदामात धान्य कुजतं कधी शेतकरी जाळून टाकतात खराब झालं की । #vidya

21 May 2018 19:58
आता महाराष्ट्रात पेट्रोल चे भाव वाढले यात कर्नाटक निवडणूकीचा काय संबंध। zee news ची बातमी मात्र अशीच आहे ।

21 May 2018 14:25
कोकण तात्काळच्या रेल्वे तिकीट साठी पण Agent गिरी सुरु असते । 100-150 ची तिकीट 600-700 ला विकतात। रेल्वे पोलिसांच ही कमिशन l बंद व्हायला हवं।

19 May 2018 23:26
दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।

17 May 2018 22:54
#karnatakanews
आपल्या संविधानात कायदा केलाच नाही की कोणी त्रिशंकू निवडणूकीचा निकाल लागला की काय निर्णय राज्यपाल यांनी घ्यावा । #ibnlokmat बेधडक मध्ये न्यायमूर्ती उल्हास बापट यांनी सांगितलं कायदा बनवा ... खेळा पूर्वीचे नियम माहिती असले की खेळ खेळायला सोपं जातं । राज्यपाल कोणतंही मत घेऊ शकतो नाहीतर ।

17 May 2018 22:54
#karnatakanews
आपल्या संविधानात कायदा केलाच नाही की कोणी त्रिशंकू निवडणूकीचा निकाल लागला की काय निर्णय राज्यपाल यांनी घ्यावा । #ibnlokmat बेधडक मध्ये न्यायमूर्ती उल्हास बापट यांनी सांगितलं कायदा बनवा ... खेळा पूर्वीचे नियम माहिती असले की खेळ खेळायला सोपं जातं । राज्यपाल कोणतंही मत घेऊ शकतो नाहीतर ।

17 May 2018 12:10
राजकीय नेते निवडणूक सत्तेत येण्यासाठी लढत असतात आणि जनता राजकीय पक्षांचे विचार पटले नाही तरी कोणी राजकारणात मात्र शिरत नाही। बाकी राजकारणी राजकारण करणार नाही तर कोण करणार । तसही राजकारण कंपनी मध्ये इतर ठिकाणी जिथे नको तिथे ही होतच असतं की । #vidya

16 May 2018 23:42
दहशतवाद्यांना
धर्म नसतो । तरी रमजान मध्ये Ceasefire बंदी घालण्यात आली आहे । #फिरभीमेरादेशमहान

16 May 2018 23:36
शत्रु ला हरवलं मात्र स्वकीयांनी घात केला। #छत्रपतीसंभाजीमहाराजांचाइतिहास

16 May 2018 23:02
मागे सरकारी दवाखाण्यात जाहिरात पाहिली .अभियान मुली वाचवा आणि कारण काय दिलंय की मुलांना सूना कश्या मिळतील। मानसिकता काही बदलली नाही।

15 May 2018 11:45
दिल्लीचा लालकिल्ला हा देखभालीसाठी इतके वर्ष इमामांच्या ताब्यात होता. वर काही कोटी रुपये सरकार त्यांना द्यायचे.

काही लक्षात आले का ?

15 May 2018 11:44
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात, AMU मधे SC/ST विद्यार्थ्यांसाठी कोणतीही शिष्यवृत्ती/ आरक्षण नाही. कारण तिथे विशेष मुस्लिम कायदा आहे.   Atul Agnihotri




13 May 2018 21:25
आजरा पेक्षा मानसिक त्रास वाईट । सहनशक्ती प्रत्येकाची वेगळी असते।

13 May 2018 20:02
दिवस साजरा करायचा का कोणता यावर चर्चा असतात नेहमीच्याच । आज होता जागतिक आई दिवस । मातृत्व दिवस नाही। आता काही सासू सुनांना छळतात वारस मिळाला नाही म्हणून मग यांत समाज वाईट आहे की । समाजाला सुधारा की विचारांनी । दिवस साजरा न करण्याचं कारण काय काय शोधून काढतील त्यांनाच माहिती । ज्यांना वाटेल त्यांनी दिवस साजरे करावेत नाही त्यांनी नाही । #vidya

13 May 2018 18:11
हे असंच चालू राहणार । मराठी माणूसच हिंदी ने सुरवात करतो संवाद करताना ।

12 May 2018 12:53
कोणी चित्रपट किंवा नाटक बघा असं सुचवलं तेव्हाच गेलेलं बरं। तसेही दर्जेदार चित्रपट कमीच येतात । आणि महा गुरु चे चित्रपट असला तर टाळलेलाच बरा । #vidya

12 May 2018 12:34
खोदा पहाड निकला चुहा ।
चित्रपटांच्या Marketing चा फंडा । तुम्ही प्रसिद्ध झालात म्हणून कोणतीही भूमिका स्वीकारायला मोकळे । ही मराठी चित्रपट करणाऱ्याचं वास्तव। हिंदी मध्ये कलाकार कोणता त्याला विचारात घेऊन चित्रपट बनवला जातो।

12 May 2018 12:29
मालिका असो वा चित्रपट पैश्याचा खेळ आहे नुसता। दर्जेदार असं कधीतरी येतं।

12 May 2018 12:22
चित्रपटाची जितकी प्रसिद्धी करतात त्या पेक्षा अधिक नकारात्मक प्रतिक्रिया पसरली पाहिजे म्हणजे लवकरात लवकर चित्रपट आपटतील। social media best आहे । loss मध्ये गेल्या शिवाय यांची बुद्धी ठिकाणावर येणार नाही।

11 May 2018 22:18
आजाराने घात केला। मग मनाने । धाडसी कितीही असलं तरी त्याला मर्यादा नाही। शेवटच्या श्वासा पर्यंत संघर्ष अटळ असतो।

11 May 2018 22:02
आजाराने घात केला। मग मनाने । धाडसी कितीही असलं तरी त्याला मर्यादा नाही। शेवटच्या श्वासा पर्यंत संघर्ष अटळ असतो।

11 May 2018 19:16
Living life according to hindu scripture is always better than being hindu by birth . #vidya

11 May 2018 18:56
आता बिनदास्त भात ,तूरडाळ ,गोड पदार्थ खायचे आणि नंतर शुगर वाढली म्हणून गडबड करायची । ह्याला म्हणतात भोगा कर्माची फळं। 

**ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं ।

11 May 2018 18:28
अनुभवाने माणूस शहाणा होतो। म्हणून शांत राहिलेलं उत्तम। संवाद नाही झाले तरी वाद तरी टळतात..!

11 May 2018 12:43
आपला समाज मागासलेला आहे म्हणायचं । बाहेरच्या देशात तलाक घेतलेले असो वा विधवा विधूर दुसरा विवाह सहज शक्य असतो । अविवाहित मुलगा विवाहित बाई अशी ही लग्न होतात ।
11 May 2018 12:41
हो समाजाची मानसिकता बदलली नाही अजून । नुसतं कायद्याने काय होतय । इकडे काही दुसऱ्या ला सतवायला ही तलाक देत नाही आणि ज्यांनी घेतले त्यांच्या चुका शोधण्यात त्याच्या विषयी gossiping करणारे ही असतात मंडळी । दुसरं लग्न करणं अजून तरी सहज नाही आपल्या इथे । मग ते विधवेचं असो वा तलाक झाल्यावरच ।




0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .