निरोपाचा क्षण
हळवा होतो..
डोळ्यासमोर आपलं माणूस असतं..
भेटीचे क्षण खास होतात..
निशब्दता अंतरी पसरते..
नजरभेटीचे खेळ सुरू होतात..
भावना अंतरी दाटतात..
नजरेनेच संवाद सुरू होतो..
अश्रूंचा बांध कोसळतो..
श्वासांची गती मंदावते..
हृदय धडधडते...
हात हातात घेऊन ..
काळजी घे..
सांभाळून जा..
बोलून निरोप घेतला जातो..
भावना अबोल होतात ..
निशब्दता खोलवर पसरते..
निरोप घेणे जड जातं ..
वळून मागे बघायचं नाही हे ही मनात ठरवलं जातं..
पुन्हा भेटू या आशेवर ..
निरोप घेतला जातो..
आठवणींमध्ये भेटीला उजाळा देतो..
© #vidyamslife
८.७.२०२१

0 comments:
Post a Comment