मानसिक आरोग्याबद्दल समाजात जागरूकता कमी आहे. जितक्या सहज शारीरिक आरोग्य बिघडलं की लगेच व्यक्ती डॉ कडे जाते तितक्या सहज मानसोपचार तज्ञां कडे जायचा विचार सुद्धा करत नाही ना स्वतः मानसिक तणावाखाली असणारी व्यक्ती ना नातेवाईक! आपल्याकडे तणावाची कारणं कधी आपण आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून किंवा आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली नाही म्हणून समाज किंवा घरचेच मानसिक त्रास देण्यात पुढे असतात. उदाहरण द्यायचं तर नोकरी मिळत नसते तेव्हा आधार द्यायचं सोडून सतत घालून पाडून बोलणं . मार्ग काढणं आणि समस्या सोडवणं करण्यापेक्षा समाज आणि नातेवाईक पुढेच असतात.सतत स्वतःची तुलना करणं इतरांसोबत हे ही कारण असतं मानसिक तणावाचं. घाई घाई नुसती घाई कुठे जायचं असतं कोणाशी स्पर्धा करतोय .. कोणाला सिद्ध करून दाखवायचं असतं. मन , शरीर आणि बुद्धी यांचा समतोल राखणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मानसोपचार तज्ञांची किंवा योग्य गुरू ची मदत घेणं कधीही उत्तम. जसं कौटूंबिक डॉ ठरलेले असतात तसं मानसिक तणाव आला की काय करावं यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती आपल्याला आधीच माहिती हवी . मग ती डॉ असो किंवा आपल्या जवळची मैत्रीण किंवा मित्र . बोलण्याने व्यक्त होण्याने सुद्धा मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
व्यक्त व्हा ! समाजात जागरूकता पसरवा! शाळेत ,महाविद्यालयात सुद्धा यावर चर्चा व्हायला हव्यात!
तरच आपला समाज सुदृढ होईल खऱ्या अर्थाने !
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment