कोणत्याही राजकीय पक्षाचे असो कार्यकर्ते सामान्य माणूस असतात .
ह्यावेळी मनसे च्या कार्यकर्त्यांने वयस्कर नागरिकांना लस ज्यांना मिळाली नाही त्यांच्या साठी लस उपलब्ध केली ती ही सरकारी हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे वडिलांना लस मिळाली.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाऊ आजारी होता एप्रिल मे मध्ये तेव्हा नवीन आजाराबद्दल माहिती दिली. डॉ ना काय विचारायचं हे सांगितलं . अज्ञानात सुख नसतं हेच खरं !
घड्याळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वडलांच्या ओळखीचे होते त्यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल !
काही फेसबुक वर न भेटलेल्या आणि भेटलेल्या मित्रमंडळी नि मानसिक आधार दिला.
डॉ दिवस होता तेव्हा सांगायचं राहील
डॉ भोसले यांनी भावाला जीवनदान दिलं.
सध्याच्या परिस्थितीत अशी असंख्य माणसं आहेत जी मदत करत आहेत .
🙏
लवकर सगळं ठीक होवो हीच अपेक्षा !
गणपती बाप्पा मोरया !
© #vidyamslife
११.७.२०२१

0 comments:
Post a Comment