#कोरोनाचं संकट जोपर्यंत आपल्या भागात नसतं तोपर्यंत सगळं ठीक सुरू असतं! राजकीय नेते एक झालेत पण fb वरचे राजकीय पोस्ट बहाद्दूर यांच्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही! बघावं तेव्हा राजकारण सुरूच! मी मतदान करीन तोच योग्य आणि इतर ज्याला मतदान करतात तो चुकीचाच अश्याच भ्रमात असतात! आपल्या देशात लोकशाही आहे ज्याला त्याला कोणाला मत द्यायचं कोणाला नाही हे पक्कं माहीती असतं! तसही fb वरच्या प्रत्येक मित्रमंडळी चे मतदान करण्याचे प्रभाग वेगळे , तिथले राजकारण वेगळं , तिथली राजकीय गणिते वेगळी त्यामुळे रोज रोज टीकात्मक राजकीय पोस्ट करून कसला आसुरी आनंद मिळत असतो काहींना माहिती नाही!
सामान्य माणसांच्या बाजूने असतील तर आपल्या आवडीच्या पक्षातील सुद्धा चुका दाखवतील पण नाही ! हे फक्त माणसं बघून विरोध करतात !
संत हत्या झाली तेव्हा ही मंडळी गप्प बसतात !
धारकरी ला सामान्य माणसाला मारहाण झाली तरी ही मंडळी गप्पच!
#विद्या

0 comments:
Post a Comment