...
नाती हरवतात... संवाद पेक्षा मनाची अंतरे वाढल्याने।एकमेकांना समजून घेणं संपतं। मृत्यू आड येतं नाही । मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात ।
...
मन दुरावली आता । आधी सारखा मोकळा संवाद हरवला ।
2018
....
दिवस साजरा करायचा का कोणता यावर चर्चा असतात नेहमीच्याच । आज होता जागतिक आई दिवस । मातृत्व दिवस नाही। आता काही सासू सुनांना छळतात वारस मिळाला नाही म्हणून मग यांत समाज वाईट आहे की । समाजाला सुधारा की विचारांनी । दिवस साजरा न करण्याचं कारण काय काय शोधून काढतील त्यांनाच माहिती । ज्यांना वाटेल त्यांनी दिवस साजरे करावेत नाही त्यांनी नाही । #vidya
...
Freedom is life ! #vidya
..
आम्ही दोघी मराठी चित्रपट अप्रतिम आहे
नात्यांवर भाष्य करणारा .. गौरी देशपांडे यांच्या कथेवर आहे .... दोन पिढीतले मतभेद .... प्रेम , विवाह संस्था , सावत्र आई..हे विषय ..... बापाला काळजी असली तरी मातृत्व पेलता येईलच असं नाही। थोडंस काल्पनिक च आहे तरी पात्रांचं वागणं #विद्या
.......
वेगळया वाटा निराळे आपले आभाळ हे
का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे....
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
.....
लाख शंका या मनाशी प्रश्न होती भोवरे
का तुझ्या डोळयात माझी शोधते मी उत्तरे
वाटते का हे निराळे मला माझे वागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
वेगळया वाटा निराळे आपले आभाळही
का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळही....
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
#आम्ही_दोघी #GuruThakur
https://youtu.be/ozK6qNLPBFY
....
हे असंच चालू राहणार । मराठी माणूसच हिंदी ने सुरवात करतो संवाद करताना ।
...

0 comments:
Post a Comment