ओळख

एखाद्या सोबत ओळख करून द्या  असं बोलतो तेव्हा फक्त नाव सांगणं   इतकाच अर्थ असतो . ती झाली तोंड ओळख. कोणालाच आपली ओळख सांगायांची गरज भासत नाही तेव्हा होते ती खरी ओळख .जी कर्माने होते .
दुसरी व्यक्तिगत ओळख  नाती नवीन जुळताना होते ....जितकं व्यक्त होऊ तितकं नातं घट्ट होतं..
जसं आई मुलीच न बोलता ही जरा काही बिनसलं तरी एकमेकांना कळतं . एक मैत्रीचं . जेव्हा मन विचार जुळतात तेव्हा मैत्रीचं नात ही उलगडत जातं . जितकं व्यक्त व्हाल तितकंच उमगत जातं . आपण आहोत तसं आपसूकच एकमेकांना स्वीकारलं जातं.  वयाची अट नसते फक्त मन जुळण एवढीच अट . तिथे मैत्री च नात खुलतं बहरतं.
कधी कधी थोडासा काळ पुरेसा  असतो  एखाद्याशी जुळायला कधी वर्ष वर्ष राहिलो सोबत  तरी मैत्री होतं नाही. पुलं च्या भाषेत वेवलेंथ जुळत नाही. कुटूंबात सोबत असूनही कधी माणस  अनोळखीच तर कधी अनोळख्या सारखी वावरतात . अट्टहास करून मैत्री करायचा किंवा कोणतंही नातं जुळवायचा प्रयत्न शेवटी चुकतोच .
टाळी एका हाताने वाजत नाही.
सगळ्याशी आपलं पटायला हवं स्वभाव एकमेकांचे जुळायला हवेत हा हट्ट  पण चुकीचाच.
तर  कधी लांब राहूनही नातं टिकवल जातं तर कधी नाही पटलं नात्याचंच ओझं झालं तर दुरावल जातं . जी नाती सहज जुळली जातात; ज्यामध्ये सहजपणा जपला जातो; जी मनाने मनाशी जुळली जातात ;  ती कायम सोबत राहतात  भेटी गाठी  होवो  वा न होवो तरी तशीच मनात जपली जातात.
    आणि एक  ओळख जी  स्वतः ची स्वतः ला असावी लागते.  आपण जितकं स्वतः ला  ओळखतो तितकं कोणीच ओळखू शकतं नाही .म्हणून कधी कधी स्वतः शीच भेट घ्यावी.  कोण किती ओळखत आपल्याला हे ही आपल्यावरच अवलबुनं असतं.आपण जितकं व्यक्त होतो त्यावरून.  शेवटी संवादाशिवाय ओळख होणं अशक्यच.
#Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .