खजुराहो

खजुराहो बद्दल ओशो आणि सद्गुरू बद्दल विचार मांडले आहेत त्याबद्दल एवढच कळलं कि कामसूत्र विज्ञान सारख लैंगिकता ह्या एका विषयावर लिहिलेलं पुस्तक आहे . त्यात अश्लील काही नाही .  मंदिराच्या बाहेर मुर्त्या दिसतात आत नाही. स्त्री पुरुष ह्या द्वैत भावातून संसार झाला .मनुष्याने  संसाराचा उपभोग घेऊन झाला किंवा   ह्या मूर्ती कडे सारखं बघत राहिल कि एक दिवशी नक्की उबग येईल वासना कमी होतील संसारात मन रमणार नाही . तेव्हा  मंदिरात प्रवेश करावा म्हणजे परमार्थ ...अद्वैत भाव सूरु .
======
नास्तिक जितक्या देवा विषयी आणि धर्मा विषयी चर्चा करतात तितक्या चर्चा तर आस्तिक सुध्दा करत नाहीत म्हणून अंधश्रध्येचे बळी होतात लोक ....
======
वासना मोकाट च असते आणि ज्याच्या कडे विवेकबुद्धी नसते ते त्या वासनेचा शिकार होतात । त्याच्यात आणि जनावरात काही च अंतर नाही। मनुष्य जात देव आणि जनावर ह्याच्या मध्यभागी आहे  । हे संतुलन राखायला बुद्धी दिली आहे । धर्म ही आलेत   ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .