या बाईने हिंदूच #धर्मातरण करून नंतर सुध्दा त्या लोकांना हिंदूंच्या आरक्षण चा लाभ मिळावा म्हणून आंदोलन केली !
ईसाई लोक गरिब हिंदू धर्मातरण करतात ! पण त्याच्या अमेरिकेत असणाऱ्या गरीब इसाई लोकांसाठी काहीही करत नाही !
.....
मदर टेरेसा ब्वा ब्वा ..... काय ते थोतांड
आपल्या सर्वांना बालपणापासून मदर टेरेसाबद्दल बरंच काही शिकवलं जातं.त्यांनी केलेल्या कार्यांमुळे त्यांना माणुसकीचा दीपस्तंभ वगैरे म्हणून दाखवलं जातं.तरीही आपल्या अभ्यासक्रमातील पुस्तकं त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगणं 'विसरतात'! (विसरत आली आहेत); विशेषतः त्यांची राजकीय वातावरणावर प्रभाव टाकणारी भूमिका व त्याबद्दल निर्माण झालेले वाद आदि.त्यांपैकी एक अप्रसिद्ध राहिलेलं उदाहरण म्हणजे त्यांनी केलेलं एक आंदोलन.जे त्यांचा छुपा धर्मांतराचा मिशनरी अजेंडा उघडा पाडतं.
तत्पूर्वी याची पार्श्वभूमी बघूया - भारतीय संविधानानुसार हिंदू धर्मात अंतर्भूत असणाऱ्या विविध जातींना व समुदायांना राखीव जागा,आरक्षण असे अधिकार देण्यात आलेले आहेत.या जाती व समुदाय हे हिंदू धर्मातून धर्मांतरित होऊन इतर धर्मात जसे की ख्रिश्चन, मुस्लिम ई.धर्मांतरित होत असतील तर वरील आरक्षण आदी सवलती त्यांना मिळणे बंद होतात.
मागील कित्येक दशकांपासून भारतातील ख्रिश्चन मिशनरी या घटनादत्त नियमाच्या विरोधात होते; कारण हा नियम त्यांच्या भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतराचे 'पीक' काढण्याच्या मनसूब्यातील मुख्य अडथळा होता व त्यांच्या निशाण्यावर असणारी गरीब,अशिक्षित व भोळी भाबडी जनता फक्त एखाद्या 'तांदळाच्या पिशवीच्या' किंवा 'फक्त मानवतेच्या' मोबदल्यात हिंदू धर्मात राहून मिळणारे आरक्षण वगैरे लाभ सोडून ख्रिश्चन धर्मांतरित होण्यास तयार होत नव्हती.
शेवटी निराश झालेल्या मिशनरिंच्या शांतपणाचा बांध फुटला व १९९० च्या दशकांत त्यांनी एक देशव्यापी आंदोलन उभे केले त्याचं नेतृत्व केलं खुद्द मदर टेरेसा यांनी. त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली.हे आंदोलन १० दिवसांचं होतं.ज्यातील प्रमुख मागणी होती की 'धर्मांतरित झालेल्या व्यक्तीला पूर्वीच्या सारखेच आरक्षण आदी लाभ मिळावेत.'
हे आंदोलन प्रचंड वादग्रस्त ठरू लागलं कारण यामुळे सेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर धर्मांतरं करण्याच्या मिशनरिंचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला; विशेष करून मदर टेरेसा यांचा! याची प्रचिती त्यांना स्वतःला येणे सुरू झाले.त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने खाली येऊ लागला अगदी 'तटस्थ' म्हणविणाऱ्या गटांमध्ये सुद्धा यांचा खरा 'अजेंडा' समजून चुकल्यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली.मग यापुढे त्यांच्या प्रतिमेला अधिक 'नुकसान' नको म्हणून तत्कालीन मुख्य वृत्तपत्रे आदी माध्यमांनी (जी की कम्युनिस्ट व व्हॅटिकन पोषीत होती) ताबडतोब या आंदोलनाच्या बातम्या दाबून टाकल्या व यावरील गदारोळ शांत करण्याचा प्रयत्न केला.काही दिवसांनी बहुतांश भारतीय ह्या प्रकरणाला (नेहमीप्रमाणे!) विसरले आणि पुन्हा मदरचा व मिशनरिंचा जयजयकार करीत सत्याला दुर्लक्षित तिला 'रोल मॉडेल' मानू लागले.
https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19951215-mother-teresa-protests-to-demand-extension-of-sc-status-to-dalits-converted-to-christianity-808049-1995-12-15

0 comments:
Post a Comment