नाती

नात्यांना मरण नसतं ।
अगदी मृत्यु ही आड येत नाही
जेव्हा ती मनाने जोडलेली असतात।
जी तुटतात ती नाती नव्हेच।
तिथे फक्त असतात त्या अपेक्षांची ओझी।
नात्यातला ओलावा जिंवतपणी
आटतो तेव्हा खरं नात्याचं अस्तित्व संपुष्टात येतं।
एकदा जुळलेल्या
नात्याला ना संवादाची ना सहवासाची गरज असते  ना अट्टहास असतो ।

देहाच्या अंतराने नाही तर नाती
मनाच्या अंतर वाढल्यामुळे तुटतात। मतभेद जास्त झाले मतभेद सुरू झाले की नातं संपतं ।

#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .