Forgiveness माफ करण्याची कला ते ही कमीत कमी वेळेत ही फक्त पालकां कडे असते आणि आपण जितक्या हक्काने पालकांसोबत आपण जसे आहोत तसे बोलायचो व्यक्त व्हायचो तसं इतरां सोबत बोलू शकत नाही याची जाणीव नातेवाईक (आपल्याला न ओळखणारी माणसं ) करून देतात! आपल्याला जस आहोत तस स्वीकारणारे पहिले पालकच असतात नंतर भाऊ बहीण किंवा मित्रमंडळी !
उंबरठ्या बाहेर सुरू होतो तो समाज असतो त्यात कुटुंब सोडून इतर येतात आणि त्यात नातेवाईक असतात याचीही जाणीव होते हळूहळू!
आई गेली की उंबरठ्याच्या आतलं जग बदलतं आणि बाप गेला की उंबरठ्या बाहेरच जग बदलतं! काही गोष्टी पालक शिकवतात आणि काही मग समाज शिकवतो आपसूकच जगता जगता!

0 comments:
Post a Comment