post 62

आज काल तर रिक्षा चालक आणि त्यात बसणारे मराठी असले तरी हिंदी ही बोलणारे आहेत. मग रिक्षा वाले सुद्धा ग्राहकाच्या भाषेत बोलतात नाहीतर मराठी बोलतात. शहरात तर समोरची व्यक्तीला मराठी आहे माहिती नसेल तर सुद्धा हिंदी ,इंग्रजी भाषेत संवाद सुरू केले जातात. मानसिकता आहे नुसती. गुजरात मध्ये भाषेची संमेलन होत नाहीत तरीही तिथे गुजराती बोलतात सगळे. इतर राज्यातून कोणी आलं कळलं तरच हिंदी मध्ये बोलतात त्यातही काही अति शिकलेले इंग्रजी मध्ये बोलतात.

अजूनही सुप्रीम कोर्टात भारतीय भाषेत काम होत नाहीत तर फक्त इंग्रजीत होतात. आता कुठे शेवटचा निकाल तरी ज्याची केस असेल त्या व्यक्ती च्या मातृभाषेतून द्यायला मोदी सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलं आहे ऐकलं होतं.

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .