आयुष्याच्या खऱ्या रंगमंचावर
वावरताना , असंख्य भूमिका पार पडत असतो आपण.. कोणी आई ची कोणी मुलीची , बायकोची , बहीणीची. तर कोणी बापाची ,मुलाची ,नवऱ्याची ,भावाची.कधी गुरु शिष्याची , कधी मित्र मैत्रीणीची.
संवादामुळेच माणूस घडत जातो , रोज नवं काही आपसुक शिकतो .पण प्रत्येक भूमिकेत तो वेगळाच असतो . वेगळच वागणं असतं ,
कधी कठोर ,कधी मृदु , कधी खट्याळ, कधी निरागस.
भाव विश्व कसं खुलुन निघतं, आयुष्याचे क्षण कधी हसरे होतात , सुख दुःखाचे सोबती होतात. अल्लड मनाच्या भाव विश्वात रमू लागतात. नात्याची सुंदर पहाट अनुभवतात.
#विद्या
29 june 2016

0 comments:
Post a Comment