प्रवास

प्रत्येकाचा अर्थ , काम , धर्म , मोक्ष या पैकी एक तरी मार्गावरचा प्रवास सुरू असतो.स्वतः ला त्याची जाणीव असली तरी खूप आहे. समाज चार दिवस सल्ले देतो चौकटीतल साचेबद्ध आयुष्य जगायचा आणि आपल्या मार्गाला निघून जातो.
शेवटी स्वतःचा प्रवास स्वतः करायचा असतो कधी सोबत असते कधी नसते. आपण आपल्या मार्गावर चालत रहायचं मग भले कोणी वंदो किंवा  निंदा करो. माणूस जन्माला येतो तो अहं घेऊन. जे विधिलिखित असतं तसं आयुष्यात घडत जात . आयुष्याला प्रश्न विचारणं म्हणजे देवालाच जाब विचारण्या सारखं आहे की. आपल्या हातात फक्त आयुष्य स्वीकारणं आणि आपलं कर्म करणं असतं.  जिथे निवांत होत मन ती दिशा योग्य. कर्माची फळ ही तोच ठरवतो आणि कर्म ही तोच करून घेतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. ओशो बोलतात ;जग निर्माण करण्याचं देवा कडे काही प्रयोजन नाही. खेळ आहे ; देवाची लिला आहे. आयुष्याकडे गांभीर्याने जगायचं ही काही कारण नाही.आलेला क्षण जगायचा. एका वेळी एक दिवस एवढंच आयुष्य. उद्या कधी येतच नसतो .
४.७.२०२३
©vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .