खरे रंग एकटी व्यक्ती सोबत संवाद करताना कळतात. म्हणून मुलींनी अनोळखी व्यक्ती सोबत मनमोकळ्या गप्पा मारू नये, कामापूरत बोलावं. घरची काम असली तरी रिक्षा करून अश्या लोकां सोबत जाणं ही टाळावं मग काका म्हणून तुम्ही हाक मारत असलात तरी.
पालक सोबत असताना सगळे गोडगोड बोलतात, मनाचे काळे रंग दिसत नसतात.
कोणी उशिरा लग्न झालं नाही म्हणून दुसऱ्या च्या मुली कडे वाईट नजरेने बघायला सुरवात करत तर कोणी बायको आजारी म्हणून दुसऱ्या स्त्री कडे किंवा मुलीं कडे नको तितकं चांगलं वागायचं , लाड पुरवायचा आणि संवाद करायला आवडतो म्हणून सारखं घरी या ना त्या कारणाने भेटी गाठी वाढवायच्या सुरू असतं.
आज काल cctv, ऑफिस सारखं तंत्रज्ञान आलं आहे, सोसायटीच्या व्यक्तीला विचारल्या शिवाय प्रवेश नसतो. म्हणून खूप स्त्रिया अश्या असंख्य वासनांध पुरुषा पासून वाचल्या म्हणायच्या.
Social media वर आज काल कोणत्याही वया च्या व्यक्ती सोबत मैत्री होते आवडी निवडी जुळल्या की माणसं सहज प्रेमात पडतात कधी एकतर्फी असतं , कधी दोन तर्फी. एकट्या स्त्रीने (लग्न न झालेल्या ) social media चा योग्य तो वापर करावा. आपल्या वयाच्या व्यक्ती सोबत बोला किंवा जास्त वयाच्या किंवा विवाहित. समोरच्या व्यक्तीने तुला bf आहे का ? लग्न झालं का? घरी कोण असतं? कोणी आवडलं की नाही अजून? असले personal व्ययक्तिक प्रश्न विचारायला सुरवात केली की समजून जायचं
ती व्यक्ती single आहे विवाहित असली तरी. तिला सुध्दा तात्पुरती सोबत हवी आहे.
भावनेच्या भरात स्त्रिया वाहत जातात , विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडतात , प्रेमभंग होतो किंवा सगळं जीव ही देतात. कारण एखाद्या व्यक्ती ची सवय झाली असते. अचानक ती व्यक्ती सोडून गेली की मानसिक त्रास अटळ आहे. म्हणून सावध पणे स्त्रियांनी social media वापरणे गरजेचं आहे. स्त्रिया कडे six sense असतो , vibes मुळे ही कळतं, पण हे खऱ्या आयुष्यात शक्य आहे. Social media वर वावरण्या आधी स्त्रियांना पुरुषांची psychology माहिती हवी .खऱ्या आयुष्यात अनोळखी व्यक्ती सोबत हाथ मिळवणं , शारीरिक संपर्क करणं टाळावं. त्यापेक्षा नमस्कार करणं उत्तम.
स्वतःला मानसिक त्रास होणार नाही इतकी काळजी मात्र घ्यावी.
© Vidya M S
28.11.2022

0 comments:
Post a Comment