लग्न

जेव्हा स्त्री काम करत असते तेव्हा दिसत नसतं जेव्हा काम करत नसते तेव्हा सगळ्याच लक्ष जातं! पुरुषी अहं दुसरं काय .. स्वतः च्या मनासारख आयुष्य लग्न झालेल्या स्त्रियांना  जगायला मिळेलच असं नसतं ! जिथे मन जुळत नाहीत ती नातीच नसतात नुसतं अक्षता टाकून दोन शरीराच नातं! आपल्या इथे मनाला तसंही दुय्यम स्थान असतं ! माणूस कसा आहे समजून घ्यायच्या आधीच लग्न उरकून टाकतात! मग कधी नात्यात पुरुष चुकीचा असतो कधी स्त्री  !  काही नाती समाजा साठी टिकून राहिलेली असतात! इकडे पटलं नाही म्हणून कोणी काडीमोड केला घुसमट स्वीकारली नाही तरी समाजाला चर्चा करायचा विषय मिळतो ! आपल्या इथे माणूस जगतो किती माहिती नाही ? का आयुष्य घालवतो..

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .