आयुष्य

नवीन मराठी मालिका बघायला जावं तर संघर्ष करणार मध्यमवर्गीय घर जिथे नवरा बायको दोघेही नोकरी करतात दाखवलं तरी पैश्याची कमी! खऱ्या आयुष्यात ही घरं उच्च मध्यम वर्गीय मध्ये मोजली जातात! भावनिक वाटावं म्हणून काय काय मालिकेत दाखवतात! साधी सोपं जगणं दाखवायला काय हरकत आहे! 

आज काल मराठी माणूस स्वतः चा उद्योग सुरू करू लागला आहे ! फक्त एकदा मार्ग मिळाला की झाली सुरवात! मालिका करणाऱ्यांनी जरा विषय बदलायला हवेत की ! स्वप्न पूर्ण करतानाचा प्रवास ... सुध्दा सकारात्मक असू शकतो की!
सतत रडगाणं असणाऱ्या गोष्टी पेक्षा नसलेल्या गोष्टी आठवण म्हणजे समाधान नाही च मग सुखी घरं तरी कसं दाखवणार!

ह म बने शेवटची मराठी आवडलेली मालिका ! खऱ्या समाजाचा आरसा दाखवते!

 विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .