12 October 2018 12:49
आपल्या देशात जितक्या भाषा चलनावर लिहिल्या जातात त्या सगळ्या राज्यभाषा आहेत आणि राष्ट्रभाषा आहेत ..फक्त हिंदी एकच राष्ट्रभाषा आहे हा गैरसमज ..
12 October 2018 12:45
#metoo व्यक्त होण्याच उत्तम माध्यम आहे ... ज्याचं जळतं त्याला कळतं .. इतर जण हे का कशासाठी चर्चा सुरू करतात नाही तर विनोद करतात #blackroseindia fb page सुरू झालंय ..खरं तर समाजाचा आरसा दाखवतो ... स्त्री असो वा पुरुष सगळे व्यक्त होतं आहेत ... लैगिक अत्याचार वाढल्यामुळे शाळेत शिक्षण देण्याची गरज आहे मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही असं वाटतं #vidya
11 October 2018 20:01
माणसं दुरावली तरी चालतील पण नात्यात 'space' द्यायला शिकावं ..न दिल्यामुळे ही नाती दुरावतात .. रुक्षपणा वाढतोय आणि माणसातला माणूस हरवतोय
11 October 2018 19:59
Me too मोहीम बद्दल ना ... जर खरंच कोणी त्रास दिला तर सरळ पोलिसात तक्रार करावी .. bollywood मध्ये काय खऱ्या आयुष्यात ही देतात की त्रास .. हुमा कुरेशी बोलल्या बदनामी करण्यासाठी metoo चा वापर करू नका म्हणून.. व्यक्त व्हायला platform मिळालं हे चांगलं आहे की ..
11 October 2018 19:42
जुनी ओळख .. कधीच संपर्कात नसलेल्या व्यक्तींना शुभेच्छा देणं योग्य का ..fb वर ही फक्त frnd list मध्ये असतात काही ओळखी चे काही अनोळखी .. मैत्री च नसेल तर अट्टहास नसलेलाच बरा ना .. आपण fb वर शुभेच्छा दिल्या काय नाही काय समोरच्याला काही फरक पडणार आहे का .. तशाही आपण मैत्री केली की कायम शुभेच्छा असतातच की .. त्यांना wish करून वर्षातून एकदा बोलणं म्हणजे आता distrub करण्या सारखं वाटायला लागलंय ..
10 October 2018 21:30
What the bhakta (devotee) calls surrender, the man who does vichara (Self-Inquiry) calls jnana. Both are trying only to take the ego back to the source from which it sprang, and make it merge there.
(Day by Day with Bhagavan)
10 October 2018 15:23
Radio वर गाणी ऐकायची रात्री .. fb पासून लांब राहायचं .. खऱ्या आयुष्यात मन मोकळं करावंसं वाटतं त्या मित्रांना भेटायचं ...आपला आणि विचाराचा काही संबंध नाही असं म्हणून दुर्लक्ष करायला शिकायचं..कोणत्या तरी कामात व्यस्त रहायचं.. 😊
9 October 2018 22:16
वाद च नाही मुळी ... orkut संवादाचं आणि माणसं जोडण्याचं उत्तम माध्यम होतं ... बनवणाऱ्या व्यक्तीचा उद्देश हि तो च होता ...म्हणून orkut आठवतं ... बाकी social media पैसे कमवण्याच्या उद्देशाने च बनवल्या आहेत ... fb सोडून नवीन social media यायला हवं असं मला तरी वाटतं .. बघू कधी येतेय
3 October 2018 12:58
People are two types one are inclusive and others are exclusive.
दुसऱ्यांना सामावून घेण्याची वृत्ती उपजतच असावी लागते.. that's the reason power is given to the inclusive people not to the exclusive ones...☺️
3 October 2018 12:52
स्त्रियांना आधीच पुरुषांपेक्षा अधिक सौंदर्य दिलेलं असताना
त्यांना अधिक सौंदर्याचा अट्टहास कशाला असतो.. कदाचित स्त्रियां मध्ये स्पर्धा असावी नाही का ?🤣 पण ह्या दुसऱ्याला आवडावं म्हणून केलेल्या गोष्टी मूळे अपेक्षा ही वाढतात ..स्तुती पेक्षा उपहास केला की काही जण तर suicide ही करतात .. आज काल डोक्यावर तेल लावलं ह्या क्षुल्लक कारणा साठी ही जीव देणाऱ्या मुलींच्या बातम्या वाचल्या आहेत..तूमच्या कडे जे आहे त्या पेक्षा जे नाही हे दाखवण्यात त्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहीराती अग्रेसर असतात #vidya
3 October 2018 12:40
#Be #Yourself
बाह्यसौंदर्य (?) पहिलं दिसतं म्हणून समाज नाव ठेवायला पुढे च असतो.. मनाचं सौंदर्य ओळख झाल्या शिवाय कसं दिसेल ...पूर्व ग्रह दूषित माणसं आधीच ती व्यक्ती कशी असेल ह्याचे अंदाज बांधून मोकळे होतात तिला माणूस म्हणून स्वीकारणं तर दूरच राहतं.. स्वतः च्या आनंदा साठी केलेली कृती उत्तम .. इतरांना impress करायच्या भानगडीत पडावंच कशाला .. स्वतः स्वतःला आहोत तसं स्वीकारलं तर इतरांच्या मतांकडे आपोआप दुर्लक्ष होतं ...इतरांनी स्वीकारलं न स्वीकारलं त्याचा त्रासही मग होतं नाही .. #vidya
3 October 2018 12:40
For the Jnani there will be no feeling
that he is doing anything and
so there will be no bondage....
Sri Ramana Maharshi....
8 October 2018 14:11
We are so engrossed with the objects,
or appearances revealed by the light,
that we pay no attention to the light.
Sri Ramana Maharshi
3 October 2018 11:57
मीठ सोडून सगळं अंदाजे प्रमाण ठरवता आलं की तुम्हाला जेवण करता येतं असं समजायला हरकत नाही ☺️
30 September 2018 23:04
लेखन किंवा कला कशासाठी ??
आपल्या तर मनातल्या ज्या काही भावना असतील त्यांचा निचरा होतो या निमित्ताने .. राग, चीड ,आठवणी यांना वाट मिळते आणि मन मोकळं होतं अगदी पाऊस पडून झाल्यावर आभाळ निरभ्र व्हावं तसं । #vidya
30 September 2018 21:02
विवेकानंद म्हणाले होते, "कुणाला काहीही वाटले तरी आपण आपल्या जाणिवांच्या वाटेवर अथक चालत रहावे"
30 September 2018 11:27
आपलं तर आवडतं feature आहे memories .. वाचलेल्या share केलेल्या पोस्ट पुन्हा बघायला मिळतात.. ! तरीही आधी जगायला हवं मग आठवणी होणार त्यासाठी fb post करायलाच हवी याची काही गरज नाही .. ! ☺️ #vidya
30 September 2018 10:39
How people behave with others
is because of their own Sanskaras not urs behavior responsible every time ! #vidya
30 September 2018 00:12
बाबा बाबा असतात आणि आजोबा आजोबा .. आमच्या वेळी गावी खळ्यात आजोबां सोबत मातीत खेळायचो..तेही अंदाजे शंभरी च्या पुढे इतकं वय .. एकच आठवण आहे ...दुसरी पर्यंत सहवास लाभला .. आम्ही मात्र वडिलांच्या धाकात ..
29 September 2018 22:17
एक कायदा रद्द झाला म्हणून कविता आणि नको ते विचार मांडतात काही group वर.. स्त्री अत्याचार विरोधात कायदा आहे .. हुंडा , भ्रूणहत्या विरोधात कायदे आहेत तरी इथल्या स्त्रिया काही सुरक्षित नाही .. कायदे बदलून नाही तर मानसिकता बदलून समाज बदलतो .. एक कायदा गेला की दुसरा कायदा येतो .. कायद्याचा वापर करणाऱ्याची संख्या कमीच .. न्याय मिळणं तर दूरची गोष्ट इथे #vidya
29 September 2018 19:37
एकदा समोरचा माणूस मनातून उतरला की त्याचा आणि आपला संबंध संपलाच .. राग वैगरे नाही .. विचार मन जुळली नाही तिथे संवादाची ही अपेक्षा नसते .. समोरचा माणूस आपण कसे ही वागलो तर काय बोलेल हे आधीच कळतं.... टोकाची मतं असणाऱ्या सोबत संवाद न केलेला उत्तम .. आहे तस त्या व्यक्तीला स्वीकारणं .. शांत राहणं उत्तम .. स्वतः च्या मन शांती साठी#vidya
29 September 2018 19:15
माणूस गेल्यावर जितकी स्तुती करतात तितकी तो असताना किती जण करतात.. अटल जी गेले तेव्हा विचार आला ..व्यक्ती असताना योग्य त्या व्यक्तीं कडून योग्य तो मान त्या त्या वेळी दिला तर इथेच स्वर्ग होईल नाही का? पण अहं आडवा येतो ना..
29 September 2018 18:52
कुछ तो लोग कहेंगे .. आपल्या जगण्याच्या पध्दतीवर टीका केली .. आवडी निवडी वर भाष्य केले तर दुर्लक्ष करण योग्य ... सल्ला देणाऱ्यांची ही कमी नसते आज काल ..एका कानाने ऐकायचं आणि सोडून द्यायच ठरवलं आहे.. एकदा समोरच्या व्यक्तीचे विचार कळले की मन मोकळे पणाने आधी सारखं बोलता येत मात्र नाही.. विचार टोकाचे असतात तिथे संवाद करणं टाळणं योग्य वाटतं .. काही जण किती टोचून बोलतात .. विचार सुद्धा करतं नाही समोरच्याला काय वाटेल याचा .. वायफळ बडबड केली की झालं .. काहींना तर दुसऱ्याच्या व्ययक्तिक आयुष्यात काय चाललं आहे ह्याची माहिती नसते तरीही बोलत राहतात काही बाही जसं काय सगळी
29 September 2018 18:42
आपल्या कडे सगळं कसं साचेबद्ध हवं असतं .. शाळा कॉलेज शिक्षण पूर्ण झालं वेळेवर नोकरी ..लग्न संसार ..सगळं समाजाच्या साच्यात बसलं की स्वीकारणार समाज नाही तर बिघडला बोलायला मोकळे
29 September 2018 18:42
आपलं तर समोरचा माणूस मनातून उतरला की त्याचा आणि आपला संबंध संपलाच .. राग वैगरे नाही विचार मन जुळली नाही तिथे संवादाची ही अपेक्षा नसते .. समोरचा माणूस काय बोलेल हे अधिच कळतं..
29 September 2018 18:06
वाचकांना लेखन मात्र वाचायचं असतं पण तुम्ही काम काय करता म्हणून विचारपूस केली जाते .. साहित्यिक साहित्यिक म्हणून समाधानाने त्याच्या मर्जी प्रमाणे आयुष्य जगू शकत नाही का ? ह्यांना पुस्तक बरी वाचायला आवडतात एक एक पण त्या लेखन करणाऱ्या व्यक्तीला आहे तसा स्वीकारण्याची कुवत मात्र नसते .. वाचन झालं की स्तुती सुमन उधळायला हे मोकळे #vidya
29 September 2018 18:01
आता जम्मू काश्मीर मध्ये हिंदू ची संख्या वाढली आहे म्हणून हिंसा करणाऱ्या रोहिंग्या समाजाला आणून इतर धर्माची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होता .. काँग्रेस असती तर सफल झालं असतं .. मागे रेल्वे भरून बांग्लादेशी मुस्लिम मुंबई मधून बांग्लादेशात पाठवायचा मुबंई पोलिसांनी काम केलं पण ह्या vote बँक राजकारणा मुळे ते आपल्या देशातच राहिले ... उत्तर प्रदेश का पश्चिम बंगाल मध्ये थांबवण्यात आलं त्यांना .. :(
29 September 2018 15:01
काय बोलावं , कसं , कधी आणि कोणाशी बोलावं हे चुका करत करतच माणूस शिकू शकतो
29 September 2018 14:10
Gossip करणारे , दुसऱ्याला नाव ठेवणारे आपल्या सोबत कोणी असलं की समजून जायचं की ती व्यक्ती आपल्या मागून ही बोलू शकते .. मागे एक जण जिच्या मुळे मैत्री झाली तिच्या बद्दल मागे बोलायची .. शाळे पासून चा राग द्वेष जपून ठेवला होता तिने .. तिचा फोन आला की खोटं बोलायची , गोड बोलायची ..
29 September 2018 12:27
ज्यांना माहिती असेल त्यांनी माहीती द्यावी ही अपेक्षा.. आपल्या इथे स्त्रियांनी लग्ना नंतर नाव बदलायची प्रथा कधी पासून सुरू झाली आणि स्त्रियांनी मंगळसूत्र घालायची ही सुद्धा ??
29 September 2018 00:26
आपल्या इथे बायका किती सती सावित्री सारख्या वागतात आणि फक्त पुरुषच स्वैराचार करतात असा पुरुषांचा आणि स्त्रियांचा दोघांचाही समज .. काही हुंडा घेतला म्हणून नवऱ्या कडून पैसे उचळणाऱ्या ही असतात मग दुसरा नवरा शोधतात ..गुन्हेगारी सुरू .. मागे एका मराठी वाहिनी वर बाई ने किती लग्न केली ही बातमी आली ... शेवटच्या नवऱ्याला कळलं तेव्हा तिचा गुन्हा दिसला .. लग्न झाल्यावर दोघ सुखी नसली तर तिसरी व्यक्ती येतेच की आयुष्यात .. तो कायदा रद्द झाला पण कायदा काय होता कोणालाच माहिती नाही आणि सरळ विनोद सुरू .... स्त्री आणि पुरुष दोघांच्या विरोधातच होता .. हे ही माहीत नाही .. कायदा नाही म्हणून लगेच स्वैराचार बोकाळणार बोलायला मोकळे सगळे .. विवाह व्यवस्था बदल कोणी सुचवणार नाही कोणी काडीमोड घेतला पटतं नाही म्हणून तर चर्चा होणार कोण चूक कोण बरोबर .. काही बैल जोताला जुंपतात तसे आयुष्य संपेपर्यंत आयुष्याचं शेत नांगरणार हाती सुखा शिवाय जगणार ..
28 September 2018 23:25
फक्त Fb वर add friend केल्याने मैत्री होते का .. आपल्याला तर नाही वाटतं .. मोजक्याच जणांसोबत संवाद केला जातो fb logout केल्यावर किती जणांची नाव लक्षात असतात आपल्या .. हे ज्याचं त्याला माहिती असतं.. आणि त्यातल्या किती जणांच्या संपर्कात असतो ते ही .. खरी मैत्री fb वर unfriend केल्याने तुटत नसते ..
28 September 2018 18:42
गणेशोत्सव च्या वेळी बार डान्स सुरू होता बरं का .. सण सोडून सगळ्या स्वार्थासाठी सणांचा वापर केला जातो .. सामाजिक भान राहील बाजूला
28 September 2018 18:28
मुलांना जेवण करता येणं हा ही आई वडिलांचा संस्कार नाहीतर काही ठिकाणी ताट सुद्धा उचलायच नाही हेच शिकवलं जातं काही घरात अजुनही अमेरिकेत नवरा बायको दोघंही मदत करतात तिकडे कामवाली बाई इथल्या सारख्या झटपट मिळत नसतात किंवा संख्या कमी नाही तर इथे मुलांनी जरा काही घरचं काम केलं तर स्तुती सुमन उधळण होते #vidya
28 September 2018 00:12
असंच होतं नेहमीच ज्याला जगायचं असतं त्या व्यक्तीला आयुष्यातून जावं लागतं :( ज्यांना रस नसतो त्यांना मात्र न चुकता जगावंच लागतं .. उसके मर्जी के आगे किसकी चली है वैसे भी #vidya
28 September 2018 00:04
One can postpone his bodily existence on the earth but can't escape from truth of mortal body..#vidya
जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना गीत आठवलं .
27 September 2018 23:18
Pop चे गणपती बनवण्या मागे फक्त पैसा कमवण असतं ..मोठे मोठे कारखाने बनवायचे .. पुढे हे मंडळ मोठे का ते मंडळ मोठं .. गणपती मातीच्या मूर्ती ने बनवणं त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा केली की झालं .. ज्यांना जमतं नाही त्यांनी तरी छोट्या प्रति मूर्ती लहान मूर्ती बनवून त्यांचं विसर्जन करावं की नाहीतर रोजचचं आहे pop मूर्ती चे कुठे हात कुठे पाय समुद्र किनारी दिसणार त्यात काही जण तर विसर्जन करायला विसरलेत वाटतं .. मूर्ती विटंबना करताना काही कसं वाटतं नाही यांना :( पोस्ट बघितली की कळेल .. असे सण साजरे केले जातील टिळकांनी सुद्धा कल्पना केली नसणार .. साधं सोपं नकोच असतं म्हणा .. #विद्या
27 September 2018 22:18
आपल्या मनासारखं जगता आलं की माणसाला त्याच्या आयुष्यातला आनंद गवसतो ..
27 September 2018 16:16
माणूस सामाजिक प्राणी आहे त्याला व्यक्त व्हायला नातं हवंच असतं .. संवाद करण्यासाठी कधी समजुन घेणारं .. काहींना घरीच भेटतात तर काही मैत्री साठी नवी नाती जोडतात..तरीही स्वतःला पूर्णतः कोणी समजून घेईल आपले प्रश्न समोरची व्यक्ती सोडवेल म्हणून दुसऱ्या व्यक्ती कडून अपेक्षा करू नयेच मुळी..त्याच्या वर मानसिक दृष्टीने अवलंबून राहू नये ..आयुष्यात कधीही कोणी येतं आणि प्रारब्धात असतं तेच घडतं काही नाती आयुष्यभर साथ देणारी असतात काही वळण आली की आपापल्या मार्गाने जाणारी ही भेटतात..मोह टाळता आला वपु च्या भाषेत एकटेपणा एकांत वेगळे असतात ..एकांताचा कोणी अंत करू नये ..एकटेपणा पेक्षा एकांतात आयुष्य जगावं कोणी सोबत असो वा नसो त्रास होणार नाही .. #vidya
27 September 2018 15:33
Husband is not a master ..पत्नी पुरुषाची मालमत्ता नाही .. ह्या विचाराच समर्थन करून #497 कायदा #रद्द करण्यात आला आहे.. स्वतःच्या नात्याची जबाबदारी स्वतः घ्यायची असते कायद्यावर ढकलून नाती टिकत नसतात .. एखाद्या नात्यात सुखच नसेल .. कुढत जगण्यात .. नातं टिकवण्यात काय अर्थ आहे ..बाहेरच्या देशात नातं तुटणार म्हणून सरळ एकमेकांच्या सहमतीने वेगळं होतात कोणी मानसिक त्रास देत नाही.. नातं टिकवण्यासाठी हट्ट नसतो ना तोडतेवेळी दुसऱ्याला त्रास. .. दोघात तिसरी व्यक्ती येण्याची वेळ च येत नाही मग.. #vidya
27 September 2018 15:25
#497 #रद्द
आपल्या कडे पुरुष किंवा स्त्री प्रधान #कायद्यांची कमी नाही आणि इंग्रजांनी लादलेले कायदे स्वातंत्र्य मिळाल्या वरही रद्द केले नाही हे नवल .. नवरा आरोप पत्र दाखल करणार.. स्त्री ने गुन्हा केला तर पुरुषाला शिक्षा .. त्या स्त्रीला नाही ... नवऱ्याने गुन्हा केला तर ह्या कायद्यात स्त्री ला आरोप पत्र दाखल करण्याची तरतूद नाही .. स्त्री पुरुष समानता न मानणारा कायदा होता .. आता इतिहास जमा झाला .. गुन्हा धरला जाणार नसला तरीही civil offense नक्कीच ठरणार आहे .. सरकार नवीन कायद्या आणण्यासाठी नवीन संशोधन ही करणार हे बातम्या मध्ये ऐकलं म्हणून उगाच विवाह संस्थेला धोका असं काही नाही .. मुळात नाती तुटण्यात जमा असतात त्यांनी वेगळं राहावं की कायदा नात टिकवण्यात काही हातभार लावत नाही ती जबाबदारी नात्याची असते #vidya
27 September 2018 15:24
आपल्या कडे पुरुष किंवा स्त्री प्रधान कायद्यांची कमी नाही आणि इंग्रजांनी लादलेले कायदे स्वातंत्र्य मिळाल्या वरही रद्द केले नाही हे नवल .. नवरा आरोप पत्र दाखल करणार.. स्त्री ने गुन्हा केला तर पुरुषाला शिक्षा .. त्या स्त्रीला नाही ... नवऱ्याने गुन्हा केला तर ह्या कायद्यात स्त्री ला आरोप पत्र दाखल करण्याची तरतूद नाही .. स्त्री पुरुष समानता न मानणारा कायदा होता .. आता इतिहास जमा झाला .. गुन्हा धरला जाणार नसला तरीही civil offense नक्कीच ठरणार आहे .. सरकार नवीन कायद्या आणण्यासाठी नवीन संशोधन ही करणार हे बातम्या मध्ये ऐकलं म्हणून उगाच विवाह संस्थेला धोका असं काही नाही .. मुळात नाती तुटण्यात जमा असतात त्यांनी वेगळं राहावं की कायदा नात टिकवण्यात काही हातभार लावत नाही ती जबाबदारी नात्याची असते #vidya
27 September 2018 12:11
🤣😂 जिंवतपणी मरणयातना देणारे पितृपक्षात न चुकता अन्न देतात कावळा शिवावा इतका हेतू ..
26 September 2018 12:02
काही मजेत दिवस घालवतात तर काही चिंतेत इतकाच काय तो फरक ..काही आयुष्य जगतात तर काही नुसतंच घालवतात .. ! #vidya
26 September 2018 11:27
Fb वर सगळ्या प्रकारची माणसं भेटतात .. दुसऱ्याचा द्वेष करणारी म्हणजे स्वतःला कमी लेखणारी..तुलना करून स्वतःचाच अपमान करणारी .. दुसरी जोड्या लावणारी आणि तिसरी मागून बोलणारीही असतात ..
26 September 2018 11:22
अंधाराचं स्वतंत्र्य अस्तित्व नसतं..प्रकाशाचा अभाव असतो तो फक्त !
26 September 2018 10:53
🤣 तरीही गैरसमज होणाऱ्या ची संख्या जास्त दिसते म्हणून पुन्हा पुन्हा पोस्ट कराव्या लागतात अश्या ☺️
25 September 2018 17:43
आपण फक्त खाण्यासाठी आणि पोटासाठी पदार्थ बनवायला शिकतो तसही दुसऱ्या कोणी बनवून खाण्यात जास्त आनंद असतो ना आणि सुगरण कोणाला बनायचंय..
25 September 2018 17:01
कधी आयुष्यातले प्रश्न उत्तरं शोधल्याने सुटतात तर कधी स्वतः ला आहोत तसं स्वीकारल्याने आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केल्याने .. मन कधीच वर्तमानात जगू देत नसतं म्हणून.. Meditation सर्वांत उत्तम पर्याय असतो .. वर्तमानातही जगता येतं आणि मन : शांती ही मिळते #vidya
25 September 2018 16:51
मुलं मोठी होताना गरजेच्यावेळी घरच्यांनी पाठींबा द्यायला हवा असं मागे तुम्ही बोलला होतात ना चंगो .. आजही आर्थिक पाठबळ पेक्षा मानसिक पाठबळ पुरवायला पालक कमीच पडतात .. काही जण तर motivate करण्या पेक्षा de motivate करण्यात अग्रेसर असतात .. मग त्यात समाजही मागे नसतो ..
25 September 2018 15:44
आजचा पदार्थ साबुदाणा वडा पहिल्यांदा घरी बनवला
24 September 2018 13:06
मानसिक आजारांचं मूळ कारण संवाद कमी झालाय दुसरं माणूस म्हणून माणसा सोबत माणसा सारखं वागणं संवाद करणं विसरलेत .
23 September 2018 13:23
एक सारखी गोष्ट असली तरीही त्या परिस्थितीत व्यक्ती कसा वागेल हे त्याच्या त्याच्या स्वभावावर , पूर्व संस्कारांवर , समाज विचारांवर अवलंबून असते. शेवटी व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती #vidya
23 September 2018 00:29
व्यक्ती तितक्या प्रकृती ... सारखाच प्रसंग असला तरी प्रत्येक माणूस वेगळाच वागत असतो..
22 September 2018 23:14
जिथे मन जुळणार नाही तिथे नाती जपून काय उपयोग ... निव्वळ अट्टहास..
#vidya
22 September 2018 23:12
माणसांच्या विचारा वरुन कोणाशी पटेल कोणाशी नाही हे ही समजतं ..जिथे मन जुळणार नाही तिथे नाती जपून काय उपयोग ...
#vidya
22 September 2018 23:06
हिंदी चित्रपट बघतात म्हणजे हिंदी येते त्यांना फक्त त्यांना पर राज्यातली लोकं नको म्हणून मुद्दाम हिंदी बोलणं टाळतात ...काही तर चांगल्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीला ही मानसिक त्रास देऊन हाकलतात.. माणुसकी कमी आहे हे नक्कीच..
22 September 2018 11:43
जिथे संतांची समाधी किंवा मंदिर असतात तिथे खरी भक्ती दिसते
22 September 2018 11:21 स्वतः चा मार्ग स्वतः च निवडायचा असतो ....
20 September 2018 23:32
आमच्या घरी सगळेच बोलके आहेत .. कोणाशी काय बोलाव किंवा कोणी समजून घेणार असेल तर बोलण्यात अर्थ आहे नाहीतर निरर्थकच ..म्हणून काही अबोला धरतात .... आमच्या इकडे तर वाद विवाद कधी संवाद ही होतात.. मत मांडण्यात सगळेच आघाडीवर असतात .... समजून घ्यायला कमी अधिक होतं म्हणून तर मैत्री ची गरज जास्त भासते आज काल .. #विद्या
20 September 2018 23:20
जिथे हिंदू ची संख्या कमी तिथे हिंसा अटळ.. पश्चिम बंगाल आणि केरळ उदाहरण आहेतच की
15 September 2018 21:42
जावडेकर विसरलेत वाटतं सरकारी निधी त्याच्या खिशातून नाही येत जनतेच्या करातून येतो. केजरीवाल यांच्या कडून काही शिका की.. खाजगी शाळेची फी वाढली म्हणून शाळा सरकारी केल्या.

0 comments:
Post a Comment