निसर्ग कविता

निसर्ग कविता    

मला निसर्गाच्या सानिध्यात राहून खुप काही करायच आहे
पावसात भिजून,सारं दुःख  विसरायचं आहे

पक्षी बनून आकाशात उंच उंच उडायचं आहे
समुद्राच्या पाण्यामधे जलक्रीडा करायची आहे
मला निसर्गाच्या सानिध्यात राहून खुप काही करायचं आहे

समुद्राच्या ठिकाणी शांत एकट बसून सुख अनुभवायचं आहे
एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन थंड वारे अनुभवायचे आहेत

गिर्यारोही बनून खुप उंच उंच पर्वत सर करायचे आहेत
मला निसर्गाच्या सानिध्यात राहून खुप काही करायचा आहे

मला फुलपाखरू बनून खुप खुप उडायचं आहे
आणि बगीच्या मधील सुंदर सुंदर फुलांवर जाऊन बसायचं आहे

वनात एकांत ठिकाणी जा ऊ न मन शांत करायचा आहे
समुद्राच्या लाटा बनुन खुप खुप उसळायचं आहे

सार दुःख विसरून किनाऱ्यावर शांत निवांत व्हायचा आहे
मला निसर्गाच्या सानिध्यात राहून खुप काही करायचा आहे

घोडयावर बसून सार रान फिरायचा आहे ,
मोर बनुन थुई थुई नाचायचा आहे ,

विहीर बनुन थकलेल्या वाट सरुंची तहान भागवायची आहे !
झाड बनुन उन्हात थकलेल्या वाटसरुंना  थंड सावली द्यायची आहे

नदीच्या काठी पाण्यात डुबकी मारून
निसर्गाचा सौदर्य अनुभवायचा आहे ,
सोबतीचा हाथ धरून समुद्राच्या किनारी फिरायचा आहे

उंच उंच ठिकाणी जाऊन शिवालयाचं दर्शन घ्यायचं आहे !
रंगी बिरंगी फुल बनुन सगळीकडे सुगंध पसरवायचा आहे
निसर्गात  राहुनच शेवटचा श्वास अनुभवायचा आहे

खुप ठिकाणी फिरून हे जगातील निसर्ग अनुभवायच आहे
लहान मुलांबरोबर खेळायचं आहे बागडायचे आहे
आणि ते रम्य बालपण आठवून
पुन्हा एकदा बालपणीचे क्षण अनुभवायचे आहेत
मला निसर्गाच्या सानिध्यात राहून माझं  अस स्वत:च आयुष्य जगायचं आहे

निसर्गाची ही सफर पुन्हा पुन्हा अनुभवायची आहे
मला निसर्गाच्या सानिध्यात राहून बरेच काही करायचे आहे  .

#vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .